महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्समध्ये वीजवाहिनीला धडकले विमान

06:11 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक खासगी विमान वीजवाहिनीला धडकले आहे. या दुर्घटनेत विमानातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना नॅशनल हायवे ए4 वर झाली असून विमानाने कोसळण्याच्या अध्यां तासापूर्वीच  उड्डाण   केले हेते. हे विमान सेसना 172 मॉडेलचे होते. विमानाचा वरील हिस्सा वीजवाहिनीला धडकला, यामुळे विमानाला आग लागली.

Advertisement

दुर्घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या विमानाच्या वैमानिकाला मागील वर्षीच परवाना मिळाला होता. तसेच वैमानिकाला 100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फ्रान्सच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने या दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. चालू वर्षात आतापर्यंत दोन खासगी विमाने राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनी विमानांच्या येथील उड्डाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article