For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिमालयाच्या वर दिसला विचित्र प्रकाश

06:32 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिमालयाच्या वर दिसला विचित्र प्रकाश
Advertisement

ढगांकडून अंतराळाच्या दिशेने कडाडली रंगबिरंगी वीज

Advertisement

आकाशातून जमिनीवर कोसळणारी वीज तुम्ही अनेकदा पाहिली असेल. परंतु ढगांमधून अंतराळाच्या दिशेने कडाडणारी वीज पाहिली आहे का? भुतानच्या हिमालयीन क्षेत्रात अशाप्रकारची वीज दिसून आली आहे. तेथे ढगांमधून अनेकदा अशाप्रकारचा विचित्र प्रकाश अंतराळाच्या दिशेने जाताना दिसून आला आहे.

ही काही साधारण वीज नसते, ही वीज लाल रंगाची असते, निळ्या, जांभळ्या आणि गुलाबी, नारिंगी रंगाची असते. ही अत्यंत दुर्लभ वीज आहे. ही वीज ढगांमधून पृथ्वीच्या दिशेने कडाडत नाही, तर वरच्या दिशेने जाते, ढगांपासून सुमारे 80 किलोमीटर वर आयनोस्फेयरपर्यंत.

Advertisement

भूतानमधील या असामान्य घटनेला नासाच्या वैज्ञानिकांनी चित्रित पेले आहे. ही वीज वायुमंडळाच्या वर कडाडते. अंतराळात जाणारी ही दुर्लभ वीज सामान्य वीजेपेक्षा 50 पट अधिक शक्तिशाली असते. पूर्ण जगात वर्षभरात ही दुर्लभ वीज सुमारे 1 हजारवेळा दिसते. या विजांविषयी वैज्ञानिकांना फारशी माहिती नाही. याचा शोध 20 वर्षांपूर्वीच लागला आहे. त्यांना स्प्राइट म्हटले जाते, त्यांची निर्मिती अत्यंत संवेदनशील आणि तीव्र चक्रीवादळांमुळे होते.

पाहणे अत्यंत अवघड

जेव्हा सामान्य आकाशीय वीज ढगांमधून खाली पृथ्वीच्या दिशेने कोसळते, तर स्प्राइट अंतराळाच्या दिशेने प्रवास करते. त्यांची शक्ती आणि तीव्रता अत्यंत अधिक असते. लाल रंगाची कडाडणारी वीज म्हणजेच स्प्राइट काही मिलिसेकंदांसाठीच दिसते. त्याचमुळे त्यांना पाहणे आणि त्यांचे अध्ययन करणे अत्यंत अवघड असते.

स्प्राइट्स काय असतात?

या विजेच्या वैशिष्ट्यांमुळेच त्यांना स्प्राइट नाव देण्यात आले आहे. हे स्ट्रॅटोस्फेयरमधून निघणारे ऊर्जाकण आहेत, जे तीव्र चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे निर्माण होतात. तेथे अधिक प्रवाह जेव्हा ढगांच्या वर आयनोस्फेयरमध्ये जातो, तेव्हा अनेक रंगांमधील प्रकाश दिसून येतो. सर्वसाधारणपणे हे जेलीफिश किंवा गाजराच्या आकारात दिसून येतात. त्यांची सरासरी लांबी-रुंदी 48 किलोमीटरपर्यंत असते. पृथ्वीवरून त्यांना पाहणे सोपे नसते. अधिक उंचीवर उ•ाण करत असलेले विमान, अंतराळस्थानकावरूनच स्प्राइट्सना पाहता येते. स्प्राइट्स केवळ चक्रीवादळामुळे निर्माण होत नाहीत, तर ट्रान्जिएट ल्युमिनस इव्हेंट्समुळे देखील त्यांची निर्मिती होते, त्यांना ब्ल्यू जेट्स म्हटले जाते. हा अंतराळातून खालच्या दिशेने येणारा निळा प्रकाश असतो, ज्यावर वेगळ्या प्रकारची आकृती तयार होते.

अंतराळात निर्माण होणारे स्प्राइट्स

पृथ्वीच्या वायुमंडळामुळे केवळ लाल रंगाची कडाडणारी वीज दिसून येईल हे आवश्यक नाही. हे वायुमंडळ बाळगणाऱ्या ग्रह आणि ताऱ्यांमध्येही दिसून येऊ शकते. गुरु ग्रहाच्या वायुमंडळातील अशाच स्प्राइट्सचे छायाचित्र नासाच्या वॉयेजर-1 अंतराळयानाने 1979 मध्ये काढले होते, ते ब्ल्यू जेट्स होते.

Advertisement
Tags :

.