केनियात विमान दुर्घटनाग्रस्त, 11 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नैरोबी
केनियात मंगळवारी मोठी विमान दुर्घटना झाली असून यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हंगेरीचे 8 नागरिक, 2 जर्मन नागरिक आणि एक केनियन वैमानिक सामील आहे. प्रसिद्ध मासाई मारा नॅशनल रिझर्व्हच्या दिशेने जात असलेले हे विमान केनियाच्या क्वाले क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाले आहे.
ही दुर्घटना मंगळवारी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास क्वाले येथील पर्वत आणि घनदाट जंगलक्षेत्रात घडली आहे. डायनी धावपट्टीवरून उ•ाण केल्यावर सुमारे 40 किलोमीटर अंतरानंतर विमान कोसळले आहे. दुर्घटनेवेळी किनारी क्षेत्रात मोठा पाऊस पडत होता. विमान संचालित करणारी कंपनी मोंबासा एअर सफारीने दुर्घटनेची पुष्टी दिली आहे. विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांचा मृत्यू झाला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तपास यंत्रण दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्रारंभिक अनुमान असल्याचे क्वाले काउंटी कमिशनर स्टीफन ओरिंडे यांनी सांगितले आहे.
मासाई मारा नॅशनल रिझर्व्ह आफ्रिकेतील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. तेथे दरवर्षी हजारो विदेशी पर्यटक ‘वाइल्डबीस्ट मायग्रेशन’ (हरणांचे वार्षिक स्थलांतर) पाहण्यासाठी येतात. हे अभयारण्य डायनीपासून 2 तासांच्या थेट उ•ाण अंतरावर आहे. तर या दुर्घटनेमुळे केनियाच्या विमानो•ाण सुरक्षेवरून नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.