कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टेकऑफनंतर इंजिन फेल झाल्याने विमान दुर्घटना

10:59 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वैमानिकाकडे केवळ 1 मिनिटाचा होता वेळ

Advertisement

वृत्तसंस्था/अहमदाबाद

Advertisement

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजता एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. विमानातून चालक दलाच्या सदस्यांसह 242 जण प्रवास करत होते. एअर इंडियाच्या या विमानाने लंडन येथे जाण्यासाठी टेकऑफ करताच नजीकच्या नागरी वस्तीत ते कोसळले आहे. धावपट्टीवरून एअर इंडियाचे विमान बोइंग एआय-171ने टेकऑफ करताच त्याचे इंजिन फेल झाल्याचे मानले जात आहे. वैमानिकाकडे केवळ एक मिनिटाचा वेळ होता, परंतु विमान अत्यंत कमी उंचीवर असल्याने ते इमारतींना धडकले. विमानाचा मागील हिस्सा धडकल्याने विमानात आग लागली. या दुर्घटनेप्रकरणी आता चौकशी सुरू झाली आहे.

टेकऑफदरम्यान सर्वाधिक दुर्घटना

दरवर्षी जगभरात अनेक विमान दुर्घटना होऊन देखील हवाईप्रवासाला सर्वात सुरक्षित मानले जाते. मागील 7 वर्षांमध्ये दरवर्षी सरासरी 200 विमान दुर्घटना घडल्या आहेत. नागरी उड्डाण सुरक्षेनुसार सर्वाधिक विमान दुर्घटना टेकऑफदरम्यान आणि मग लँडिंगदरम्यान होतात. 2023 मध्ये अशाप्रकारच्या 109 दुर्घटना घडल्या होत्या, ज्यातील 37 टेकऑफ तर 30 लँडिंगदरम्यान घडल्या होत्या. यावेळी एअर इंडियाचे विमान टेकऑफदरम्यानच कोसळले आहे. टेकऑफ किंवा लँडिंगदरम्यान इंजिन फेल होत असते.

6 वर्षांमध्ये 813 विमाने कोसळली

विमान दुर्घटनांवर नजर ठेवणारी संस्था एव्हिएशन सेफ्टीच्या आकडेवारीनुसार 2017-23 दरम्यान जगभरात 813 विमान दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये 1473 प्रवाशांनी जीव गमावला आहे. सर्वाधिक विमान दुर्घटना लँडिंगदरम्यान घडतात, या 7 वर्षांमध्ये लँडिंगदरम्यान 261 दुर्घटना घडल्या आहेत. त्यानंतर 212 दुर्घटना उड्डाणादरम्यान झाल्या आहेत. या कालावधीत भारतात 14 दुर्घटना घडल्या आहेत.

वैमानिकाची चूक सर्वात मोठे कारण

विमान दुर्घटनांचे सर्वात मोठे कारण वैमानिकाची चूक असल्याचे एका अहवालात नमूद आहे. विमानोड्डाणाचे दीर्घ प्रशिक्षण, विमानासंबंधी पूर्ण ज्ञान आवश्यक असते. उड्डाणांची योजना तयार करणे, हवामानाची स्थिती पाहणे, बदलांचा अनुमान लावणे या गोष्टी वैमानिकासाठी आवश्यक असतात. युरोपियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी कौन्सिलच्या एका अहवालानुसार 90 टक्के विमान दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे होत असतात.

हवाई वाहतूक नियंत्रकाचा निष्काळजीपणा

विमानोड्डाण सुरक्षेत हवाई वाहतूक नियंत्रक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. नियंत्रक विमानांना हवाईक्षेत्रात उड्डाणासाठी मार्गदशंन करण्यास मदत करतो. नियंत्रक वैमानिकांशी संवाद साधतो आणि त्यांना उड्डाणाची दिशा सांगतो.  नियंत्रक वैमानिकाला माहिती देताना चुकल्यास दुर्घटना होऊ शकते. एअर ट्रॅफिक कंट्रोल डाटा आणि ट्रान्सक्रिप्ट दुर्घटनेनंतर मर्यादित कालावधीसाठी कायम ठेवले जाते.

हवामानही मोठा घटक

हवामान अनेकदा विमान दुर्घटनांसाठी महत्त्वपूर्ण घटक ठरताहे. उड्डाण मार्गावरील हवामान जाणून घेणे वैमानिकाची जबाबदारी असते. वैमानिकांना हवामानाची माहिती देण्याची जबाबदारी हवाई वाहतूक नियंत्रकाची देखील असते. चुकीची माहिती मिळाल्यास किंवा अपेक्षित हवामानाच्या स्थितीनुसार उड्डाण कार्यक्रम न आखल्यास दुर्घटना होऊ शकतात.

विमानाची खराब देखभाल

विमानाची योग्य देखभाल देखील महत्त्वपूर्ण आहे. विमानाच्या देखभालीला नियंत्रित करणारे अनेक नियम आहेत. विमान मॅकेनिकाने चेकलिस्ट, दिशानिर्देश आणि निरीक्षण आवश्यकतांचे पालन करायला हवे. निरीक्षणाच्या आवश्यकता एफएआरच्या प्रकाराच्या आधारावर भिन्न असते, ज्याच्या अंतर्गत उड्डाण संचालित केले जाते. यांत्रिक समस्येमुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाले का हे निश्चित करणे अवघड ठरु शकते.

विमानांच्या डिझाइन्समधील दोष

विमानाची डिझाइन्स अत्यंत वेगळ्या प्रकारची असतात. विमानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंजिन्स, प्रोपेलर, पंख आणि कॉकपिट इन्स्ट्रूमेंटेशन असतात. यातील एखादा घटकही योग्यप्रकारे डिझाइन करण्यात आला नसल्यास दुर्घटना घडू शकतात. डिझाइनला योग्य प्रोटोकॉलद्वारे लागू करण्यात आले आहे की याचे परीक्षण करणे महत्त्वाचे मानले जाते. दोषपूर्ण डिझाइन विमान दुर्घटनांचे कारण ठरू शकते.

व्हीएफआर किंवा इन्स्ट्रूमेंट फ्लाइट रुल्स

हवामानाच्या स्थितीच्या आधारावर विमान व्हिज्युअल फ्लाइट रुल्स (व्हीएफआर) किंवा इन्स्ट्रूमेंट फ्लाइट रुल्स (आयएफआर)द्वारे संचालित होतात. व्हीएफआर उड्डाणाचे वैमानिक मुख्यत्वे सुरक्षितपणे उड्डाणासाठी कॉकपिटबाहेरील दृष्टी आणि दृश्य संकेतांचा वापर कतात. इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रुल्स अंतर्गत विमान संचालनात विशेष ज्ञान आणि कौशल्याची आवश्यकता असते. ढगांदरम्यान विमान उड्डाणासाठी वैमानिकांना कॉकपिट उपकरणांवर निर्भर रहावे लागते. एटीट्यूड इंडिकेटर, अल्टीमीटर, एअरस्पीड आणि हेडिंग इंडिकेटर या उपकरणांचा वापर वैमानिक करतात.

बर्ड स्ट्राइक

जगभरात दरदिनी बर्ड स्ट्राइकच्या सरासरी 150 घटना समोर येत असतात. केवळ अमेरिकेत दरवर्षी 14 हजार बर्ड स्ट्राइकच्या घटना समोर येतात. तर जगातील 80 टक्के बर्ड स्ट्राइक घटनांची नेंदच होत नसते असे बोलले जाते.

लष्कराचे पथक मदतकार्यात आघाडीवर

अहमदाबादजवळ एअर इंडिया विमान कोसळल्यानंतर सुरू असलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण प्रयत्नांमध्ये नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी सुमारे 130 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या दिमतीसाठी जेसीबीसह अभियांत्रिकी पथके, डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससह वैद्यकीय पथके, जलद कृती पथके (क्यूएटी), अग्निशमन आणि पाण्याच्या सहाय्याने अग्निशमन उपकरणे आणि घटनास्थळ व्यवस्थापनासाठी प्रोव्होस्ट कर्मचारी यांचा समावेश आहे. लष्करी रुग्णालयालाही सतर्क ठेवण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article