उद्यानाच्या प्रवेशद्वारात शौचालय बांधण्याचा घाट
मिरज :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वारातच महापालिकेकडून शौचालय बांधकाम करण्याचा अजब प्रकार घडला. याची माहिती मिळताच माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शौचालय बांधकामाचा डाव उधळून लावला.
उद्यानाबाहेर एकमेव पुरूष शौचालय आहे. मात्र, महिलांसाठी शौचालय बांधण्याची मागणी केली जात होती. यासाठी महापालिकेने कामास मंजूरी दिली. सोमवारी दुपारी उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच बांधकाम सुऊ होते. सुरूवातीला हातगाडीवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी याला विरोध केला. मात्र, बांधकाम ठेकेदार कोणालाच जुमानत नव्हता. याची माहिती मिळताच माजी उपमहापौर आनंदा देवमाने, आरपीआयचे अशोक कांबळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी उद्यानाकडे धाव घेतली. इतर ठिकाणी जागा असताना उद्यानाच्या दरवाजात शौचालय बांधण्याचे कारण काय, असा जाब ठेकेदाराला विचारला. मात्र, अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार शौचालय बांधत असल्याचे ठेकेदाराने सांगितले.
त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शौचालय बांधकाम बंद पाडून ठेकेदाराला सर्व बांधकाम साहित्यांसह हुसकावून लावले. एकमेव सुसज्ज उद्यानात महिला भगिनींसह लहान मुलांची मोठी वर्दळ असते. अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेला उद्यान परिसर आणि मुख्य प्रवेशद्वार रिकामा करण्याकडे दुर्लक्ष कऊन शौचालय बांधण्याचा घाट घातला जात आहे. महापालिका अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत मनमानी पध्दतीने कारभार करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.