कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पीयूष चावलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

06:35 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय क्रिकेटपटू पियूष चावलाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला होता. आयपीएल 2025 च्या लिलावातही त्याने आपले नाव नोंदवले होते, मात्र कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नव्हते. दरम्यान, आता आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर पियुष चावलाने निवृत्ती जाहीर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली. ‘या अध्यायाचा शेवट करत आहे! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. या सुंदर प्रवासात पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार’.

Advertisement

मैदानावर दोन दशकांपेक्षा अधिक काळ घालवल्यानंतर, आता या सुंदर खेळाला अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे, 2007 चा टी 20 विश्वचषक आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजयी संघाचा भाग असणे या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी आशीर्वादासारखा होता. या आठवणी नेहमी माझ्या मनात कायम राहतील. इंडियन प्रीमियर लीग हा माझ्या कारकिर्दीचा एक खास भाग राहिला आहे आणि या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला आहे. यावेळी त्याने बीसीसीआय, यूपीसीए (उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन), जीसीए (गुजरात क्रिकेट असोसिएशन) आणि सर्व प्रशिक्षकांचेही आभार मानले. आपल्या वडिलांसाठी एक खास संदेश लिहिला, माझ्या स्वर्गीय वडिलांचा विशेष उल्लेख करतो. त्यांच्या विश्वासामुळे मला आत्मविश्वास मिळाला. त्यांच्याविना हा प्रवास कधीच शक्य झाला नसता, असे तो सरतेशेवटी म्हणाला.

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

पियुष चावलाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्याने आयपीएलमध्ये बराच काळ घालवला आणि पहिल्या हंगामापासूनच तो या लीगचा भाग होता. त्याने 2024 मध्ये त्याचा शेवटचा हंगाम खेळला. या दरम्यान, पीयुषने पंजाब किंग्जकडून आपला प्रवास सुरू केला, त्यानंतर तो कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचाही भाग बनला. या दरम्यान, 2014 मध्ये कोलकाताला चॅम्पियन बनवण्यात त्याने मोठी भूमिका बजावली. चावला आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे, त्याने 192 सामन्यांमध्ये 192 विकेट्स घेतल्या. याशिवाय, चावलाने एकूण 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 43 विकेट्स घेतल्या.

3 कसोटी सामने - 7 बळी

25 वनडे सामने - 32 बळी

7 टी-20 सामने - 4 बळी

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article