कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पिक्सल 9ए स्मार्टफोन भारतात लाँच

06:07 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

अलीकडेच गुगल या प्रसिद्ध कंपनीने आपला नवा पिक्सल नऊ ए हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. अँड्रॉइड 15 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत पन्नास हजार रुपयांच्या घरात असणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

या नव्या स्मार्टफोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे. धूळ आणि पाणीरोधक असा हा स्मार्टफोन असणार असून या स्मार्टफोनला &ंअॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गोरिला ग्लास 3 चे संरक्षण मिळणार आहे. आयरिस, ऑबसिडीयन आणि पोर्सलेन या तीन रंगांमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून अॅस्ट्रोफोटोग्राफी, अॅड मी आणि रियल टोन ही तीन वैशिष्ट्यो कंपनीने समाविष्ट केली आहेत. सोबतच तीन महिन्यांचे गुगल वन आणि युट्युब प्रीमियम कंपनीने मोफत दिले आहे.

 इतर वैशिष्ठ्यो पाहुया

6.33 इंचाचा डिस्प्ले तोही पीओएलइडी प्रकारातला देण्यात आला असून 185 ग्रॅमचे वजन या स्मार्टफोनचे असेल. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह या स्मार्टफोनला 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  टेन्सर जी4 प्लस टायटन एम2 सेक्युरिटी कोप्रोसेसर हा प्रोसेसर या स्मार्टफोनला दिला असून 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ठळक वैशिष्ट्यो...

► 6.33 इंचाचा पीओएलइडी डिस्प्ले

► किंमत 50 हजार रुपये

► 185 ग्रॅम वजन

► 48 एमपी, 13 एमपी कॅमेरा

► 5000 एमएएचची बॅटरी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article