पोलिसांच्या निशाण्यावर पिस्टल विक्रेते..
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
दहशत माजवण्यासाठी पुर्वी फाळकूटदादांकडून तलवार, चाकू, फायटरचा वापर केला जात होता. मात्र आता गावठी कट्टा, पिस्तुल कोल्हापुरात सहज उपलब्ध होऊ लागल्याने खेळण्यातील बंदुकीप्रमाणेच महिन्याला दोन पिस्टल कोल्हापूरातून जप्त होऊ लागल्या आहेत. गतवर्षी 2024 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 26 विविध प्रकारच्या बंदुका आणि 1 एअरगन जप्त केली आहे. शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये तऊणाई मोठ्या प्रमाणात गुरफटल्याचे या कारवायांमधून समोर आले आहे. 2025 च्या तीन महिन्यांमध्येच स्थानिक गुन्हे अन्वेषणने 5 पिस्टला आणि 21 राऊंड काडतूस जप्त केले आहेत.
तलवार, चाकू, सत्तूर आणि फायटरचा वापर काळाच्या ओघात मागे पडला. आता भागात दहशत माजवण्यासाठी सर्रास बंदुकी, छोट्या पिस्टलचा वापर केला जात आहे. 2024 पासून कोल्हापूर पोलिसांनी शस्त्र तस्करी विरोधात धडक मोहीम राबवली आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या 26 बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 42 जणांवर गुन्हा दाखल केला असून, यापैकी 32 जण 30 वर्षाच्या आतील असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभुमीवर पोलीस यंत्रणेकडून अवैध बंदुका, पिस्तुल, अन्य शस्त्रांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे.
- मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमार्गे कोल्हापुरात
कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात यापूर्वी शस्त्र तस्करीच्या उलाढाली होत होत्या, आता तस्करीचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. अनेक शस्त्र तस्करीच्या गुह्यांमध्ये तऊण अडकले आहेत. जिह्यातील काही तस्करांचे थेट कनेक्शन मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहारसह राजस्थान राज्यात असल्याचे समोर आले आहे. पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, बंदुकीची तस्करी ट्रक, मालवाहतूक गाड्यांमधून होते. काही वेळा शस्त्रतस्कर स्वत: दुचाकीवऊन त्याची तस्करी करतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानातून बांधकाम व्यवसायासाठी येणारे कामगारही या शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
- तस्करांच्या हालचालींवर करडी नजर
अवैधरित्या शस्त्र वापरणे कायद्याने गुन्हा आहे. परवानाधारकांनीही शस्त्राचा गैरवापर करुन नये. तसेच अशा प्रकारे कोणाकडेही विनापरवाना शस्त्र आढळल्यास नागरीकांनी थेट स्थानिक गुन्हे अन्वेषणशी संपर्क साधावा. वर्षभरात शस्त्र तस्करांवर धडक कारवाई करत त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण
- सिक्स एम.एम. 30 तर 9 एम.एम. 80 हजार रुपयांत
कोल्हापूरात सिक्स एम.एम. (सिक्सर) आणि नाईन एम.एम. बंदूक मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथे 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत सिक्सर मिळते. त्याची विक्री कोल्हापुरात 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत केली जाते. तर 9 एम.एम. पिस्टल 40 हजारांपर्यंत मिळत असून, त्याची विक्री 80 हजार रुपयांपर्यंत होते.
- जिलेटीन, डिटोनेटर्स सह जिवंत काडतूस जप्त
2024 मध्ये कोल्हापूर पोलिसांनी 2 मॅगझीन, 80 जिवंत राऊंड, 5 जिवंत काडतूस जप्त केले आहेत. याचसोबत 800 नग जिलेटीन तर 46 नग डिटोनेटर्सही जप्त केले आहेत.
- जिह्यातील परवानाधारक
शस्त्र परवानाधारक : 7500
स्पोर्टस रायफल : 150
शेती संरक्षणाची शस्त्रs : 400
- 2024 मधील कारवाया
गावठी बनावटीचे पिस्टल : 11
गावठी कट्टा : 2
गावठी रिव्हॉल्व्हर : 2
12 बोअर बंदूक : 1
सिंगल बोअर बंदूक : 1
पिस्टल : 2
एअर गन : 1
रिव्हॉल्व्हर : 1
ठेचणीची बंदूक : 2
दोन नळी गावठी बंदूक : 1