For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाईक व्हिलिंग प्रकरणी पिरनवाडीचा तरुण ताब्यात

12:34 PM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
बाईक व्हिलिंग प्रकरणी पिरनवाडीचा तरुण ताब्यात
Advertisement

बेळगाव : धूमस्टाईलने मोटारसायकल चालवित व्हिलिंग करणाऱ्या एकाला दक्षिण रहदारी पोलिसांनी ताब्यात घेण्यासह मोटारसायकलदेखील जप्त केली आहे. कार्तिक संजू मास्तमर्डी (वय 24) रा. अन्सार गल्ली पिरनवाडी असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात बीएनएस कायदा 2023 आणि मोटार वाहन व्हिलिंग कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी काँग्रेस रोडवरील सेकंड गेटजवळ एफझेड मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणांनी व्हिलिंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधिताचा शोध घेऊन कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार दक्षिण रहदारी पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एस. मादर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर वाहन पिरनवाडी येथील कार्तिक मास्तमर्डी याचे असल्याचा शोध लावला. मोटारसायकल मालकाच्या घराकडे जाऊन विचारपूस केली असता त्याने व्हिलिंग केल्याची कबुली दिली. केए 22 एचडी 9635 क्रमांकाच्या आपल्या मोटारसायकलच्या मागच्या शिटवर मित्र शोएब महमदगौस किल्लेदार हा बसला होता असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोटारसायकल मालक कार्तिक मास्तमर्डी याला ताब्यात घेण्यासह मोटारसायकलही जप्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.