पिरळ पुल बनलाय धोकादायक! उंची वाढवून रुंदीकरण करण्याची मागणी
राधानगरी / प्रतिनिधी
आरे-पिरळ या मार्गावरील पिरळ ता, राधानगरी येथील पुल धोकादायक पूल बनलेला आहे, या पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने मंगळवारी सकाळी सकाळी सहा वाजता चार चाकी गाडी रस्त्यांच्या खड्ड्यामुळे पुलावरून खाली जात होती थोडक्यात पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.
सदरचा पूल दिवंगत माजी आमदार शंकर धोंडी पाटील व नामदेवराव भोईटे यांच्या कारकिर्दीत सन 1995 साली बांधण्यात आला होता, या पुलाला 29 वर्ष पूर्ण झाली असून या पुलावरून खाजगी वाहने व प्रवासी बस यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते, अद्यापही या पुलाकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष झाले असून दरवर्षी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर या पुलावर पाणी येत असल्याने या पुलावरुन वाहतूक बंद असते, तसेच या ठिकाणी वारंवार किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक होत चाललेला आहे.
हा पूल अरुंद असल्यामुळे ये- जा करण्यासाठी अवजड वाहनांना थांबावे लागते, पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे असल्यामुळे हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे ,तरी संबंधित विभागाने वाहनधारकांची व स्थानिक ग्रामस्थांची दखल घेऊन पूलाची उंची वाढवावी व पूल रुंदीकरण करावे व संबंधित पुलाचे प्रस्ताव दुहेरीकरणासाठी पाठवण्यात शासनाकडे यावेत अशी मागणी जिल्हा सहसंयोजक भाजपा डी जी चौगले यांनी केली आहे,