For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी पोलीस वसाहतीत पाईपलाईनला गळती

01:09 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी पोलीस वसाहतीत पाईपलाईनला गळती
Advertisement

पाणी जातेय वाया ; पाईपलाईनची पोलीस खात्याने दुरुस्ती करावी ; पालिकेने केले स्पष्ट

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी पोलीस वसाहतीत पाईपलाईन मध्ये पाण्याची गळती  लागली आहे. ती पाईपलाईन पोलीस खात्याअंतर्गत आहे. त्याची दुरुस्ती पोलीस खात्याने करून घेतली पाहिजे त्याच्याशी नगरपालिकेचा कोणताही संबंध नसल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे .पालिकेने पोलीस वसाहतीत पाईपलाईन दिलेली आहे. ही पाईपलाईन ज्या ठिकाणी मीटर आहे त्या ठिकाण पर्यंत सुरळीत आहे .पोलीस लाईनच्या वसाहतीच्या मीटरकडे पाणी पुरवठा सुरळीत आहे. परंतु, पाण्याच्या मीटर पुढील अंतर्गत पाईपलाईन ही पोलिसांच्या मालकीची आहे .अंतर्गत पाईपलाईन वर गळती झालेली आहे. त्याची दुरुस्ती पोलीस खात्याने करून घेणे आवश्यक आहे . या संदर्भात पालिकेने पोलीस खात्याला पत्र दिले आहे. परंतु या पत्राकडे पोलीस खात्याने दुर्लक्ष केले आहे .मीटर पर्यंत पाणी सुरळीतपणे सुरू आहे. त्या पुढील कनेक्शन पोलीस खात्याने विविध ठिकाणी जोडले आहे. त्याची दुरुस्ती पोलीस खात्याने करणे आवश्यक आहे. परंतु ही दुरुस्ती न केल्याने गळती लागून पाणी वाया जात आहे. मात्र याचे खापर काहीजण पालिकेवर फोडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातर्फे ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. पोलीस खात्याने त्यांच्या नावे मीटर असताना ते अंतर्गत पाईपलाईन का दुरुस्त करत नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.