कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ

10:28 AM Jul 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुतगे येथे रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी 

Advertisement

वार्ताहर/सांबरा

Advertisement

मुतगे येथील ग्रामदेवता व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भावकेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.या यात्रेची देवस्थान कमिटी, ग्राम सुधारणा मंडळ व ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी वेशीमध्ये भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे. तर भक्तांना देवीचे सुलभरीत्या दर्शन घेता यावे यासाठी महिला व पुरुषांसाठी खास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

प्रारंभी सकाळी गावातील जैन बांधवांच्या घरातून उत्सवमूर्ती वाजतगाजत मंदिराकडे आणण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी व विधिवत पूजन झाल्यानंतर सर्वप्रथम हक्कदारांच्या ओट्या भरण्यात आल्या. यावेळी सर्व हक्कदार, देवस्थान कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर सार्वजनिक ओटी भरण्यास प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जितके भाविक दर्शन घेऊन जात होते तितकेच भाविक गावात दाखल होत होते. सायंकाळनंतर गर्दीमध्ये वाढ झाली.

पाळणे-मनोरंजनाचे खेळ दाखल

रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून गावामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. याकडे मारीहाळ पोलीस जातीने लक्ष ठेवून होते. मंदिरामध्येही पोलिसांनी सेवा बजावली. तर भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय मेन रोड बाजूच्या न्यू इंग्लिश स्कूल व मराठी प्राथमिक शाळेच्या मैदानावर करण्यात आली होती. यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीनेही स्वच्छता मोहीम राबवून योग्य ती खबरदारी घेतली आहे. रात्री बारानंतर गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम पार पडला.यात्रेनिमित्त गावामध्ये अनेक पाळणे व विविध खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

यात्रेचा आज मुख्य दिवस

शनिवार दि. 19 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने गावामध्ये घरोघरी जेवणाचा बेत असणार आहे. त्यामुळे मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरी यात्रेला येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी लावूनच गावात यावे, असे कळविण्यात आले आहे.

‘तरुण भारत’च्या यात्रा विशेषांकाचे थाटात प्रकाशन

मुतगे येथे शुक्रवार दि. 18 पासून सुरू झालेल्या श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त दै. ‘तरुण भारत’च्या वतीने काढण्यात आलेल्या यात्रा विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. यात्रा विशेषांकात गावचा संपूर्ण इतिहास, यात्रेची वैशिष्ट्यापूर्ण माहिती, गावातील मंदिरांची व इतर माहिती सचित्र व सविस्तर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी ग्रा. पं. माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक करताना म्हणाले की, दै. ‘तरुण भारत’च्या वतीने काढण्यात आलेल्या विशेष अंकामध्ये गावच्या संपूर्ण इतिहासाचा व यात्रेच्या माहितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे पुरवणी अत्यंत वाचनीय झाली आहे. यासाठी दैनिक तरुण भारतचे आम्ही आभार मानण्यात आले. त्यानंतर देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ता. पं. माजी सदस्य सुनील अष्टेकर, शामराव पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्ष उमेश पुरी, शिवाजी कणबरकर, देवस्थान कमिटीचे सदस्य हेमंत पाटील, भाऊ पाटील, सचिन पाटील, राजू कणबरकर, आप्पांना चौगुले, प्रभाकर तळवार, बी. के. पाटील, बाळू बिरादार, पी. वाय. पाटीलसह देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी युवराज पाटील यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article