For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅकर्स प्रिमीयर लीगचा फायटो मार्केटिंग संघ चॅम्पियन, सोलर हर्बो संघ उपविजेता

04:54 PM Apr 21, 2025 IST | Snehal Patil
पॅकर्स प्रिमीयर लीगचा फायटो मार्केटिंग संघ चॅम्पियन  सोलर हर्बो संघ उपविजेता
Advertisement

60 धावा करणारा फायटो मार्केटिंगचा रणजीत निकम हा सामन्याचा हिरो ठरला

Advertisement

कोल्हापूर : पॅकर्स प्रिमीअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फायटो मार्केटिंग संघाने सोलर हर्बो संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानात हा अंतिम सामना झाला. यात फायटो मार्केटिंगला विजेतेपदी विराजमान करण्यासाठी सर्वाधिक 60 धावा करणारा रणजीत निकम हा सामन्याचा हिरो ठरला. पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र रणजी संघाचे ज्येष्ठ खेळाडू मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते अंतिम सामन्यासाठी नाणेफेक करण्यात आली.

सोलर हर्बो या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 166 धावा केल्या. विश्वजीत जगतापने 33, आशुतोष माळीने 33, आणि क्षितिज पाटीलने 27 धावा करत संघाच्या धावसंख्येला मोठा आकार आणला. गोलंदाजी करताना फायटो मार्केटिंग संघाच्या अजित लोखंडेने 2 बळी तर रणजीत निकम आणि आशुतोष अंबपकर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल खेळताना फायटो मार्केटिंग संघाने 18.5 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा करत सामन्यात विजय मिळवताना स्पर्धेचे जेतेपदही प्राप्त केले. या जेतेपदासाठी रणजीत निकमने 60, धनराज सोनुलेने 32, देवेश वराडेने नाबाद 22 आणि सुरज कोंढाळकरने 20 धावा ठोकल्या.

Advertisement

गोलंदाजी करताना सोलर हर्बोच्या भरत पुरोहितने 2 बळी तर बालाजी माने, आशुतोष माळी आणि रोहित बिराजदार यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.बक्षीस वितरण समारंभात स्पर्धा विजेत्या फायटो मार्केटिंग संघाला 50 हजार रुपये आणि फिरता चषक देऊन सन्मानित केले. उपविजेत्या सोलर हर्बो संघाला 30 हजार व चषक देऊन गौरवले. उद्योजक नरेंद्र झंवर, विजय पत्की, पार्थ नागेशकर, राजू नागेशकर व दिलीप गुणे यांच्या हस्ते फायटो मार्केटिंग व सोलर हर्बो या संघांनी बक्षीसे स्वीकारली.

यावेळी प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू उमर फरास, माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे, केदार गुणे, पार्थ गुणे, पॅकर्स क्रिकेट क्लबचे अध्यक्ष रमेश हजारे, रणजीपटू उमेश गोटखिंडीकर, भूपत शिंदे, प्रवीण कळकुंबे, राजेश केळवकर, मुबारक शेख, नितीन सावर्डेकर, संजय कदम, राजू सोमानी, विजय सोमानी, हेमंत कानिटकर, अंकुश निपाणीकर व अनंत चौगुले आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरी

  • मालिकावीर - सुरज कोंढाळकर (फायटो मार्केटिंग) 238 धावा
  • उत्कृष्ट फलंदाज - अविनाश कांबळे (सोलर हर्बो) 154 धावा
  • उत्कृष्ट गोलंदाज - आशुतोष अंबपकर (फायटो मार्केटिंग)12 बळी

वरील तिघांनाही माजी रणजी खेळाडू मिलिंद कुलकर्णी, उमेश गोटखिंडीकर आणि प्रवीण कळकुंबे यांच्या हस्ते प्रत्येकी 5 हजार ऊपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

Advertisement
Tags :

.