For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'रामरक्षा' स्त्रोताच्या वाचनाने शारीरिक व मानसिक समाधान !

04:23 PM Sep 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
 रामरक्षा  स्त्रोताच्या वाचनाने शारीरिक व मानसिक समाधान
Advertisement

बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचे प्रतिपादन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी 

संस्कृत भाषेतील 'श्री सार्थ रामरक्षा' हे स्तोत्राची महती सर्वसामान्यांना कळावी तसेच ते भाविकांना वाचता येऊन त्याचा अर्थ लक्षात यावा यासाठी ओटवणे देवस्थानचे निस्सीम सेवेकरी तथा कवी कृष्णा देवळी यांनी या स्तोत्राचा मराठीत ओवीबद्द केलेला अनुवाद हे पुण्ण्याचे कार्य आहे. या स्त्रोताच्या वाचनाने शारीरिक आणि मानसिक समाधान चिरंतन स्वरूपात प्राप्त होणार आहे असे प्रतिपादन बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी केले.ओटवणे येथील प्रसिद्ध कवी कृष्णा देवळी यांनी 'श्री सार्थ रामरक्षा' या संस्कृत भाषेतील स्तोत्राचे मराठी भाषेत ओवीबद्ध केलेल्या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात पोलीस निरीक्षक विकास बडवे बोलत होते. ओटवणे रवळनाथ मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सरपंच आत्माराम गावकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रविंद्र गावकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, खजिनदार मनोहर मयेकर, विनायक महाबळ, निखिल बडवे, भास्कर साधले, राजाराम चिपळूणकर, पोलीस हवालदार विकी गवस, दिनेश रेडकर, रवींद्र म्हापसेकर, सगुण गावकर, कोकण व्हिजन न्यूजचे संपादक यशवंत माधव, दशरथ शृंगारे शेखर गावकर, सुनिल मेस्त्री, बाळकृष्ण सावंत, गुंडू मुळीक, मधुसुदन गावकर, नाना गावकर, प्रमोद गावकर, सुनील मयेकर, कमलाकर सुतार, रामदास पारकर, अँड परेश सावंत, सुकाजी भाईप, मंगेश गावकर, शांताराम शृंगारे, नरेंद्र कविटकर आदी उपस्थित होते.यावेळी कृष्णा देवळी यांनी श्री सार्थ रामरक्षा हे स्तोत्र प्राचीन काळी श्री बुधकौशक नामक ऋषीनी श्री प्रभुरामचंद्राच्या महतीवर लिहिलेले आहे. हे स्त्रोत्र अत्यंत प्रसिध्द आणि प्रभावी असून ते संस्कृत भाषेत असल्यामुळे त्याचा अर्थ सर्वसामान्यांना समजून येत नाही. त्यामुळे आपण या स्तोत्राचा ओवीबद्ध मराठीत अनुवाद केल्याचे सांगितले. तसेच ही स्तोत्र पुस्तिका घरोघरी पोहोचून तिचे भावपूर्ण पठण सर्वांना करता यावे यासाठी ही पुस्तिका भाविकांना विनामूल्य देणार असल्याचे सांगितले. यावेळी आत्माराम गावकर, निखिल गावड, राजाराम चिपळूणकर, विनायक महाबळ, दिनेश रेडकर, मनोहर मयेकर, यशवंत माधव, अँड परेश सावंत आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना कृष्णा देवळी यांच्या धार्मिक क्षेत्रातील विविध साहित्याचा गौरव करीत
श्री सार्थ रामरक्षा या स्त्रोत्राच्या वाचनाने रामभक्तांना फलप्राप्ती सह सुखकारक आरोग्य प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.