कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

43 कोटीत विकले गेले छायाचित्र

06:10 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

173 रुपयात केले होते खरेदी

Advertisement

जर तुम्हाला जुनी सामग्री मिळाली आणि त्याचे मूल्य तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ती टाकून द्याल. परंतु ही सामग्री मूल्यवान होती असे कळल्यावर डोक्यावर हात मारून घ्यावा लागतो. असेच काहीसे घडले आहे अमेरिकेतील एका इसमासोबत. या इसमाने एक जुने छायाचित्र 173 रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु 2015 मध्ये छायाचित्रात दिसून येणारा व्यक्ती सामान्य नसून अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती असल्याचे त्याला कळले. त्यानंतर या इसमाने छायाचित्राचा लिलाव करविला असता त्याला 43 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे.

Advertisement

2010 मध्ये रँडी गुइजारो यांच्यासोबत अजब घटना घडली. ते जुन्या वस्तू आणि एंटीक्सचे शौकीन होते. कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्को येथे स्वत:च्या घरी परतत असताना एका एंटीक दुकानाला त्यांनी भेट दिली होती. दुकानातून बाहेर पडत असतानाच त्यांची नजर 3 जुन्या छायाचित्रांवर पडली, प्रत्यक्षात त्या निगेटिव्ह होत्या.

फोटो खरेदी करण्याचा विचार त्यांच्या मनात नव्हता. तसेच त्यांच्याकडे फारस कमी पैसे शिल्लक होते. एकदा त्यांनी हे फोटो उचलले आणि पुन्हा त्याच ठिकाणी ठेवले, परंतु अचानक त्यांना हे फोटो खरेदी करावेत असे वाटले. त्यांनी 173 रुपयांमध्ये हे फोटो खरेदी केले होते.  यातील एक फोटो पाहिल्यावर ते गोंधळून जायचे. यातील एका इसमाचा चेहरा त्यांना ओळखीचा वाटत होता.

दीर्घ पडताळणीनंतर रँडी एका फोटो एक्सपर्टकडे पोहोचले, जो अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजेन्सीमध्ये काम करत होता. त्याला हा फोटो दाखविल्यावर त्याने जे उद्गार काढले ते ऐकून रँडी दंगच झाले. हा फोटो बिली द किड नावाने प्रसिद्ध अमेरिकन नागरिकाचा होता, जो 19 व्या शतकात अमेरिकेत जन्माला आला होता. हा जगातील त्याचा दुसरा अधिकृत फोटो होता.

बिली द किडचा फोटो

बिली द किडचे खरे नाव हेन्री मॅकार्टी किंवा विलियम एच. बोनी होते, ज्याचा जन्म 1859 मध्ये झाला होता आणि 1881 मध्ये मृत्यू झाला होता. तो एक अमेरिकन आउटलॉ आणि गनफायटर होता, ज्याच्यावर 9 हत्यांचे आरोप होते. तो गुन्हेगार असला तरीही त्याची फॅन फॉलोइंग अधिक असल्याने तो अमेरिकेत हिरोच ठरला होता. हे छायाचित्र 1878 मध्ये काढण्यात आले होते, या फोटोची किंमत पूर्वी 2 दशलक्ष डॉलर्स ठरविण्यात आली, जी नंतर वाढवून 5 दशलक्ष डॉलर्स करण्यात आली होती.  हा फोटो कुणी खरेदी केला हे अद्याप समजले नसले तरीही त्याने ते 43 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article