महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅफेत स्फोट घडविणाऱ्यासह संशयित दहशतवाद्याचा फोटो जारी

06:52 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोपींची माहिती देणाऱ्यास एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस जाहीर

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

बेंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने शुक्रवारी स्फोट घडविणारा मुसाविर हुसेन शाजीब आणि संशयित दहशतवादी अब्दुल मतीन अहमद ताहा यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात बॉम्ब बनविणारा सूत्रधार मुजामील शरीफ याला अटक केली आहे. गुरुवारी एनआयएने याविषयी अधिकृत माहिती दिल्यानंतर शुक्रवारी स्फोट प्रकरणात सहभागी असणाऱ्यांची माहिती फोटोसह जारी केली आहे. तसेच त्यांची माहिती देणाऱ्यास एनआयएने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडविणारा मुसावीर हुसेन शाजिब आणि फरार संशयित दहशतवादी अब्दुल मतीन अहमद ताहा यांचे फोटो व इतर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, बॉम्ब तयार करणारा मुजामील शरीफला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे. मुजामीलने बॉम्ब बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच एनआयएने त्याच्या उर्वरित आरोपींशी असलेल्या संपर्कांची माहिती गोळा केली होती.

एनआयएने आतापर्यंत केलेल्या तपासात मुजामील शरीफ याने या प्रकरणात सामील असलेल्या इतर दोन आरोपींना लॉजिस्टीक सपोर्ट दिला होता. या तीन आरोपींच्या घरांवर तसेच इतर संशयितांच्या घरांवर आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. झडतीदरम्यान रोख रकमेसह विविध डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

1 मार्च रोजी बेंगळूरच्या ब्रूकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या घटनेत कॅफेतील कर्मचारी आणि ग्राहकांसह नऊजण  जखमी झाले होते. स्फोटात कॅफेतील साहित्याचेही नुकसान झाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article