आकर्षक ऑफरसह फोन खरेदीची संधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अॅपल कंपनीचा आयफोन 16 आणि 16 प्रो या आवृत्तींची विक्री भारतीय बाजारात शुक्रवारी 20 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. नवीन आयफोन 16 मालिकेतील मॉडेलचे प्री-ऑर्डर बुकिंग 13 सप्टेंबरपासून भारतासह इतर अनेक देशांमध्ये सुरू झाले आणि आता ज्यांच्याकडे प्री-ऑर्डर आहे, त्यांनी शुक्रवारी सकाळी 8 पासून त्यांचे नवीन आयफोन प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे.
आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक अॅपल बीकेसी स्टोअर (मुंबई) किंवा अॅपल साकेत स्टोअर (दिल्ली) ला भेट देऊ शकतात. याशिवाय, ते त्यांचे आयफोन 16 मॉडेल घेण्यासाठी किंवा ऑनलाइन वितरणाची प्रतीक्षा करण्यासाठी देशभरातील अधिकृत पुनर्विक्रेत्यांवर अवलंबून राहू शकतात.
अॅपल आता आपल्या उत्पादनांच्या लाँचिंगच्या दिवशी ग्राहकांसाठी खास बँक ऑफर घेऊन येत आहे. तुमच्याकडे काही निवडक बँक कार्ड असल्यास, तुम्ही या ऑफर अंतर्गत अतिरिक्त कॅशबॅकचा लाभ निश्चितच घेऊ शकता.
कंपनी काही बँक कार्डांवर 5000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सवलत खास लॉन्च ऑफर अंतर्गत निवडक बँक कार्डांवर उपलब्ध आहे. कमी किमतीत तुमचा आवडता आयफोन 16 खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना असेल.