महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘फिर आई हसीन दिलरुबा’ लवकरच झळकणार

06:08 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

Advertisement

2021 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली रोमँटिक थ्रिलर फिल्म ‘हसीन दिलरुबा’ने लोकांची मने जिंकली होती. तापसी  पन्नू, विक्रांत मैसी आणि हर्षवर्धन राणे यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना अत्यंत पसंत पडला होता. या चित्रपटाची कहाणी स्वत:च्या पत्नीच्या हत्येवरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महिलेवर आधारित होती. आता निर्माते याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

नेटफ्लिक्सवर ‘फिर से हसीन दिलरुबा’ होत तापसी पन्नू कधी परतणार याचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे. फिर आई हसीन दिलरुबा या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी फेब्रुवारी महिन्यात एका टीझरसोबत केली होती. यावेळी हर्षवर्धन राणेच्या जागी चित्रपटात सनी कौशल याची वर्णी लागली आहे. 9 ऑगस्ट रोजी फिर आई हसीन दिलरुबा हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा नेटफ्लिक्सकडून करण्यात आली आहे.

याचबरोबर निर्मात्यांनी एक छोटासा अॅनिमेटेड टीझर प्रदर्शित केला आहे. यात तापसीच्या हातावर ठेवलेल्या पुस्तकात ‘9 ऑगस्ट को टपकेगा खून, आएगा कातिलाना मानसून’ असे लिहिले आहे.  याचबरोबर विक्रांत मैसी देखील पुस्तक वाचताना दिसून येतो. तर सनी कौशलचा लुकही सादर करण्यात आला आहे. त्याच्या हातातील पुस्तकात 2‘9 ऑगस्ट को दिल पिघलेंगे, इश्क का जहर निगलेंगे’ असे लिहिलेले आहे. तापसी पन्नूने पहिल्या भागात रानी सक्सेना नावाची भूमिका साकारली होती. तर विक्रांत मैसीने ‘ऋषभ सक्सेना’ म्हणजेच तिच्या पतीची भूमिका साकारली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article