For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रवितेजाच्या नायिकेच्या भूमिकेत उर्वशी

06:17 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
रवितेजाच्या नायिकेच्या भूमिकेत उर्वशी
Advertisement

‘प्रजाला मनीषी’ चित्रपटात वर्णी

Advertisement

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाला आता दक्षिणेचा एक मोठा चित्रपट मिळाला असून यात ती मुख्य भूमिका साकारत आहे. उर्वशी ही ‘प्रजाला मनीषी’ या चित्रपटात रवि तेजा यांची नायिका म्हणून झळकणार आहे.

मेगास्टार चिरंजीवी यांचा चित्रपट ‘वाल्टेयर विरय्या’मध्ये एका गाण्यात नृत्य करत उर्वशीने यापूर्वीच दक्षिणेत स्वत:चा ठसा उमटविला आहे. आता उर्वशी दक्षिणेचा सुपरस्टार रवि तेजासोबत ‘प्रजाला मनीषी’ चित्रपटात दिसून येणार आहे. हा एक हायव्होल्टेज मास अॅक्शन एंटरटेनर चित्रपट असणार आहे.

Advertisement

उर्वशीने आणखी एक तेलगू चित्रपट स्वीकारला आहे. दिग्दर्शक बॉबी यांनी उर्वशी यांना मुख्य नायिका म्हणून निवडले आहे. उर्वशी याचबरोबर नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत एका चित्रपटात काम करत आहे. दुसरीकडे रवि तेजा स्वत:चे आगामी चित्रपट ‘मिस्टर बच्चन’ आणि ‘आरटी75’च चित्रिकरण करत आहेत. प्रजाला मनीषी हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.