महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाकमध्ये पेट्रोल 300 रुपयांच्या जवळपास

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इराण-इस्रायलच्या तणावामुळे स्थिती : 16 दिवसांत 13 रुपयांची वाढ

Advertisement

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

Advertisement

पेट्रोल आणि डिझेल महाग होण्यामागे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय किमती वाढल्याचे कारण सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये 16 दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी, 4.53 रुपयांच्या वाढीनंतर, पेट्रोलची किंमत 293.94 पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात 87.91 रुपये) झाली. तर हाय-स्पीड डिझेल 8.14 रुपयांनी वाढून पाकिस्तानी रुपये 290.38 झाले. याशिवाय रॉकेल दरातही 6.69 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा दर आता 193.8 रुपये प्रति लिटर झाला आहे. पाकिस्तानी मीडिया ‘जिओ टीव्ही’नुसार, सरकारने म्हटले आहे की, देशातील पेट्रोलच्या किमती वाढण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली किंमत आहे. खरे तर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग होण्यामागे आंतरराष्ट्रीय किमती कारणीभूत आहेत.

 दर 15 दिवसांनी इंधन दरांचा आढावा

पाकिस्तान सरकार दर 15 दिवसांनी इंधनाच्या किमतींचा आढावा घेते. या कालावधीत, ते जागतिक तेलाच्या किमतीतील चढउतार आणि स्थानिक चलनाच्या विनिमय दरानुसार दर वाढवत असतात किंवा कमी करतात. यापूर्वी 1 एप्रिल रोजी पेट्रोलच्या दरात 9 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर एप्रिल महिन्यात पेट्रोलच्या दरात एकूण 13 रुपयांनी वाढ झाली. यापूर्वी 16 मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. प्रति लिटर पेट्रोलचा दर 279.75 रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर 285.56 रुपये होता.

मध्यमवर्गीयांना याचा फटका बसेल

पेट्रोलचा वापर बहुतांशी खाजगी वाहतूक आणि लहान वाहनांसाठी केला जातो. त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम पाकिस्तानातील मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय लोकांच्या खिशावर होणार आहे.

सरकार पेट्रोलवर 60 रुपये कर आकारते

पाकिस्तानी मीडिया ‘द डॉन’नुसार, सरकार पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 60 रुपये कर आकारत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत झालेल्या करारांतर्गत सरकारने चालू आर्थिक वर्षात 869 अब्ज रुपयांचा कर गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर) सुमारे 475 अब्ज रुपये जमा झाले आहेत आणि आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 970 अब्ज रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article