For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेट्रोल-डिझेल आजपासून 2 रुपयांनी स्वस्त; लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून दरकपात

07:12 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेट्रोल डिझेल आजपासून 2 रुपयांनी स्वस्त  लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून दरकपात
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 ऊपयांची कपात केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ट्विट करत दरकपातीसंबंधी माहिती जारी केली. शुक्रवार, 15 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात सुधारित दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आल्याने देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किमती 50 ते 72 टक्क्मयांनी वाढल्या असतानाही भारतात इंधनाच्या किमती नियंत्रित ठेवण्यात आल्या होत्या. आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये पेट्रोलची टंचाई निर्माण झाल्यानंतरही भारतात दर स्थित होते. 50 वर्षातील सर्वात मोठे तेल संकट असूनही पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशवासियांवर परिणाम झाला नाही.

Advertisement

तथापि, आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात येत असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी दर सुधारणेचा सुमारे दोन वर्षांचा कालावधी संपवल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 ऊपयांची कपात करण्यात आली. सुधारित किंमत शुक्रवार, 15 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल, असे पेट्रोलियम मंत्रालयाने गुऊवारी संध्याकाळी सांगितले. राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत सध्या 96.72 ऊपये प्रतिलिटर असून आता ती 94.72 ऊपये प्रतिलीटर झाली आहे. तर डिझेल सध्या 89.62 ऊपये प्रतिलिटर असून त्याचा दर 87.62 ऊपये प्रतिलिटर झाला आहे. देशात अन्य ठिकाणी स्थानिक करांनुसार राज्यनिहाय वेगवेगळे दर आहेत.

Advertisement
Tags :

.