कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लाल किल्ल्यावरील दाव्यासंबंधीची याचिका फेटाळली

06:04 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुघलांची सून असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लाल किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी एका महिलेने दाखल केलेली याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचे पणतू मिर्झा बेदर बख्त यांची पत्नी असल्याचा दावा करत याचिकाकर्त्या रझिया सुलताना बेगम यांनी लाल किल्ल्यावर दावा व्यक्त केला होता. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने लाल किल्ल्याचा ताबा मागणारी याचिका फेटाळून लावली होती. खटला दाखल करण्यात 150 वर्षांहून अधिक विलंब झाल्याचे न्यायालयाने म्हटले होते. तथापि, सुलताना बेगम यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

कायदेशीर वारस असल्याने रझिया बेगम यांनी याचिकेत लाल किल्ला परत करण्याची किंवा 1857 पासून आजपर्यंत भरपाईची मागणी केली होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका चुकीची आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी सुलताना बेगम यांच्या वकिलाला याचिका मागे घेण्याची परवानगी देण्यासही न्यायालयाने नकार दिला. तुम्ही फक्त लाल किल्ल्यापर्यंतच का थांबलात? त्यांनी आग्रा किल्ला, ताजमहाल, फतेहपूर सिक्री आणि इतर किल्ल्यांवर दावा का केला नाही? अशी विचारणाही सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान केली.

रझिया सुलताना बेगम कोण आहेत?

मुघल सुलतानचा शेवटचा सम्राट बहादूर शाह जफर यांचे पणतू मिर्झा बेदर बख्त यांची पत्नी असल्याचा रझिया सुलताना बेगमचा दावा आहे. 15 ऑगस्ट 1965 रोजी सुलताना 12 वर्षांची असताना त्यांचे लग्न झाले. मूळ लखनौच्या असलेल्या सुलतानाचे बालपण कोलकाता येथील तिच्या आजोबांच्या घरी गेले. सध्या ती हावडाच्या शिवपुरी भागातील एका कॉलनीत राहत आहे. स्वत:ला मुघलांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेने दिल्लीच्या लाल किल्ल्याचा ताबा मागितलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article