महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेवण्णा यांच्याकडून जामिनासाठी याचिका

06:28 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज होणार पुन्हा सुनावणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

लैंगिक शोषण प्रकरणात आरोप असणाऱ्या माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना महिलेच्या अपहरण प्रकरणात एसआयटीने शनिवारी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सोमवारी एच. डी. रेवण्णा यांनी जामीन मिळविण्यासाठी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सुनावणी एक दिवस पुढे ढकलली आहे.

पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणी एच. डी. रेवण्णा यांना चार दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले आहे. रेवण्णांनी वकिलांमार्फत जामिनसाठी याचिका दाखल केल्यानंतर एसआयटीच्या वकिलांना त्यावर आक्षेप दाखल केला. रेवण्णा यांना जामीन मंजूर केल्यास तपासात अडथळे येण्याची शक्यता आहे, असा  युक्तिवाद एसआयटीने केला आहे. यामुळे त्यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, मंगळवारपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

एसआयटीच्या ताब्यात असणारे एच. डी. रेवण्णा हे अटकेच्या कारवाईनंतर मानसिकदृष्ट्या खचले आहेत. अत्यवस्थ झाल्याने त्यांनी रविवारी रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करून इसीजी करण्यात आली. त्यामुळे त्यांची रात्री चौकशी करण्यात आली नाही. सोमवारी सकाळी 10 नंतर त्यांची चौकशी करण्यात आली.

सोमवारी सकाळी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी रेवण्णा यांना पीडित महिलेल्या कोंडून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी नेऊन झडती घेतली. यावेळी तेथे अपहृत महिलेला कडेकोड सुरक्षेत आणण्यात आले.

व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांना इशारा

हासनमधील लैंगिक शोषण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67(अ) आणि कलम 228 अ(1), भा. दं वि. च्या 292 कलमांतर्गत शिक्षापात्र गुन्हा आहे. खासगी संदेशवहन अॅपद्वारे असे व्हिडिओ पाठविणाऱ्यांचा शोध घेणे शक्य आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा माहिती तंत्रज्ञान विभागाने दिला आहे. त्याचप्रमाणे स्वत:जवळ हे व्हिडिओ ठेवून घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे पत्रक जारी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओतील पीडित महिलांची ओळख उघड करणाऱ्या व्यक्ती, माध्यमे किंवा संस्थांवर कारवाईचा इशारा एसआयटीने दिला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article