For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

8 हजार रुपयांमध्ये विकला जातोय पाळीव दगड

06:14 AM Feb 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
8 हजार रुपयांमध्ये विकला जातोय पाळीव दगड
Advertisement

पेट रॉक किंवा पाळीव दगड सध्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 8-10 हजार रुपयांमध्ये विकला जातोय. याला पाळीव श्वान किंवा मांजराचा पर्याय मानले जात आहे. हे एकप्रकारचे सजावटी खेळणे आहे. परंतु याच्या नावामागे एक रंजक कहाणी दडलेली आहे. याची सुरुवात सुमारे 50 वर्षांपूर्वी एका चेष्टेमुळे झाली होती.

Advertisement

गॅरी डाहल नावाच्या इसमाने स्वत:च्या मित्रांना त्याच्या पाळीव प्राण्यांविषयी तक्रार करताना ऐकले होते, यानंतर त्याच्या मनात पेट रॉकचा विचार आला, त्याने स्वत:च्या मित्रांना तुम्ही असे पाळीव प्राणी बाळगा जे दगडाप्रमाणे असतील आणि केवळ सजावटी असतील असे ऐकविले होते. यानंतर गॅरी डाहलने प्राण्यांच्या जागी पेट रॉक घरांमध्ये ठेवण्याचा विचार केला, कारण त्यांना स्नान घालण्याची आणि फिरविण्याची कुठलीच गरज भासणार नाही.

कुठलीही गडबड नाही, कुठलीच अॅलर्जी नाही, देखभालीत कुठलाही त्रास न देणारा पेट रॉक घरी आणल्यास आयुष्यभर साथ देईल. काहीसे असेच म्हणत 1970 च्या दशकात गॅरी डाहलने पेट रॉक विकण्यास सुरुवात केली. पेट रॉक एक पॉप संस्कृतीतून उमगलेली कल्पना होती, ज्यामुळे त्याच्या निर्मात्यांनी भरपूर पैसे कमाविले आणि दशकांपर्यंत लोकांचे लक्ष आकर्षित करत राहिला.

Advertisement

काय आहे पेट रॉक?

पेट रॉक प्रत्यक्षात एक गुळगुळीत दगड असतो, जेव्हा तो पहिल्यांदा बाजारात आणला गेला, तेव्हा त्याला कार्डबॉक्सच्या आत पुआलच्या बेडवर खरोखरच एखादा पाळीव प्राणी असल्याप्रमाणे ठेवले गेले होते. तसेच स्वाभाविक स्वरुपात श्वसनासाठी छिद्रही पाडण्यात आले होते. यात निष्क्रीय खडकांची चित्रे होती. याचे पॅकेजिंग करताना यात देखभाल आणि प्रशिक्षणासाठी मजेशीर निर्देश पुस्तिकाही देण्यात आली होती. स्वत:चा पाळीव रॉक आगामी अनेक वर्षांपर्यंत तुमचा समर्पित मित्र आणि साथीदार राहिल. हा मृत्युमुखी पडणार नाही, आजारी पडणार नाही, तो आदर्श पाळीव प्राणी असेल. दगडांचे जीवनकाळ खूपच मोठे असते, याचमुळे तुम्हा दोघांना कधी वेगळे व्हावे लागणा नाही. कमीतकमी तुमच्या पाळीव रॉकमुळे तरी नाही असे सर्व या डाहलच्या निर्देश पुस्तिकेत लिहिले गेले होते. हे सर्वकाही मजेशीर होते.

दगडांची वंशावळ

याचबरोबर वंशावळीवरही प्रकाश टाकण्यात आला. या दगडांविषयी काहीच सामान्य नसल्याचा भरवसा यामुळे याच्या मालकांना झाला. हे पाळीव दगड प्रसिद्ध खडकांच्या एका दीर्घ रांगेतून आलेले आहेत. हे पिरॅमिड आणि महान भिंतींमध्ये आढळून येणाऱ्या दगडांचे प्रकार आहेत.

ब्रँडचे पुनरुज्जीवन

डिसेंबर 1975 मध्ये नाताळादरम्यान पेट रॉक विक्रीत मोठी वृद्धी झाली. यानंतर याची लोकप्रियता संपुष्टात आली. परंतु अलिकडच्या काळात डहालने कोट्यावधी रुपये पेट रॉक विकून कमाविले आहेत. 2022 मध्ये खेळणी कंपनी सुपर इंपल्सने पेट रॉकचे अधिकार खरेदी केले. यामुळे ब्रँडचे पुनरुज्जीवन झाले. 2020 च्या दशकात दक्षिण कोरियात ध्यानधारणेसाठी पेट रॉकची लोकप्रियता वाढली.

Advertisement
Tags :

.