For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा कार्यालयात घसरून व्यक्ती जखमी

11:19 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपा कार्यालयात घसरून व्यक्ती जखमी
Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेमध्ये कामानिमित्त आलेली व्यक्ती पाय घसरून पडल्याने जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. मनपाच्या इमारतीमध्ये ठिकठिकाणी गळती लागून पाणी साचल्याने असे प्रकार घडत आहेत. याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीला लागलेली गळती काढण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असताना शहरातील समस्या काय सोडविणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

मनपा इमारतीला ठिकठिकाणी गळती लागल्याने पाणी साचले आहे. साचलेले पाणी नागरिकांच्या निदर्शनास येत नसल्याने घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. मनपा इमारतीमध्ये अनेक ठिकाणी गळती लागली आहे. कामानिमित्त आलेल्या व्यक्मतीला घसरून पडल्याने चांगलाच मार लागला आहे. पहिल्या मजल्यावरील सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीजवळ पाणी साचले आहे. सदर पाणी निदर्शनास आले नसल्याने हा प्रकार घडला. कार्यालयातील गळतीच्या समस्या सोडविल्या जात नाहीत तर अधिकारी जनतेच्या समस्या सोडवतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.