Solapur : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा तलावात पोहताना व्यक्तीचा मृत्यू
ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली
सोलापूर : तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथे असलेल्या तलावात पोहत असताना पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
नरेश सत्यनारायण रंगम (बय ४२, रा. भवानी पेठ, घोंगडे बस्ती, सोलापूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी तो मित्रासोबत तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथे गेला होता. त्यांनी तलावाजवळ बसून जेवणासाठी म्हणून सर्व मित्र गेले.
जेवण झाल्यानंतर तो तलावात टॉबर नं. २ जवळ पोहण्यासाठी गेला. तथापि पाण्याचा अंदाज न आल्याने परत वर आलाच नाही. ही बाब अग्निशमन दलाला कळविण्यात आली. रविवारी रात्रीपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला.
मात्र शोध लागला नव्हता. सोमवारी सकाळी जवान व तानाजी धुमाळ यांनी तलावात पुन्हा शोध घेत असताना सकाळी ११ वाजता तो मिळून आला.