For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan News: शासनाच्या दारू विक्रीवरील करवाढ धोरण, राज्यव्यापी बंदची घोषणा

04:40 PM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
konkan news  शासनाच्या दारू विक्रीवरील करवाढ धोरण  राज्यव्यापी बंदची घोषणा
Advertisement

                                     करवाढ धोरणाविरोधातील राज्यव्यापी संपात व्यावसायिक सहभागी होणार

चिपळूण:  परमिट रुम, बार, हॉटेल उद्या बंद राज्य शासनाच्या दारू विक्रीवरील करवाढ धोरणाविरोधात महाराष्ट्रातील परमिट रुम, बार व हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत 14 जुलै रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. चिपळुणातील विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असून सोमवारी शहरासह तालुक्यातील सर्व बार, बिअर शॉपी, परमिट रुम, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत.

Advertisement

दारूवरील व्हॅटमध्ये दुप्पट वाढ, परवाना शुल्कात 15 टक्क्यांची वाढ, तसेच उत्पादन शुल्कात तब्बल 60 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने संपूर्ण हॉटेल व बार उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. याच पार्श्वभूमीवर आहार संघटना मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा हॉटेल संघटनांच्या पुढाकाराने हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.

या बंदला चिपळूण तालुका बिअर बार परमिट रुम हॉटेल असोसिएशनने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक सोमवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपले व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Advertisement

या आंदोलनाबाबत संघटनेचे अध्यक्ष किशोर रेडीज, उपाध्यक्ष सुहास चव्हाण, सचिव प्रथमेश कापडी व खजिनदार मिलिंद गोंधळी यांनी संयुक्त पत्रकाद्वारे माहिती दिली. यामध्ये त्यांनी राज्य शासनाने लादलेली आर्थिक करवाढ परवडणारी नसून त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

यामुळे हजारो कामगार बेरोजगार होतील. शासनाने त्वरित निर्णय मागे घ्यावा अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :

.