तिखट डिशमुळे कायमस्वरुपी गमावला आवाज
महिलेचा थाई रेस्टॉरंट विरोधात खटला
कॅलिफोर्नियाच्या एका डॉक्टरने एका थाई रेस्टॉरंट विरोधात खटला दाखल केला आहे. या डॉक्टरला इतके तिखट अन मसालेदार खाद्यपदार्थ देण्यात आले की तिचा गळा स्थायी स्वरुपात खराब झाला आहे. महिला डॉक्टरने रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह करण्यात आलेल एपेटायजरला अकल्पनीय स्वरुपात तिखट ठरविले आहे.
खटल्याच्या दस्तऐवजांनुसार सैन जोस येथील न्यूरोलॉजिस्ट डॉ. हरजसलीन वालिया या कूप डी थाई नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांना ड्रॅगन बॉल्स नावाची डिश सर्व्ह करण्यात आली, ही डिश खाल्ल्यावर त्यांच्या तोंडात अन् गळ्यात तीव्र जळजळ सुरू झाली.
रेस्टॉरंटच्या ऐपेटायजरने माझे वोकल कॉर्ड, एसोफॅगसला जाळले आहे, यामुळे माझा आवाज गेला असल्याचा दावा वालिया यांनी केला आहे. ही घटना 2023 मधील असून खटला जुलै 2023 मध्ये भरण्यात आला होता. तर मे 2025 मध्ये दाखल एका फायलिंगनुसार डॉक्टर वालिया यांनी न्यायालयात स्वत:चे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.
कमी मसालेदार डिशची ऑर्डर
वालिया यांनी वेट्रेसला कमी मसालेदार डिश आणण्यास सांगितले होते, कारण त्या मसालेदार भोजन सहन करू शकत नाहीत. सर्वर याच्याशी सहमत झाला होता, मग वालिया यांनी सर्व्ह करण्यात आलेलया एपेटायजरचा एक घास खाल्ला होता.
तीव्र जळजळ
तोंड, जीभ, गळा आणि नाकातून आग बाहेर पडतेय असे वालिया यांना वाटत होते. तसेच त्यांचे डोळे आणि नाकातून पाणी वाहू लागले होते आणि त्या खोकू लागल्या होत्या. माझा आवाज गेला असून डिशमधील मिरचीमुळे अंतर्गत ‘रासायनिक जळजळ’ झाल्याचा दावा वालिया यांनी केला आहे. मला स्थायी ईजा झाली आहे. जळजळ कमी व्हावी म्हणून एका वेट्रेसकडून डेअरी उत्पादने मागविली, परंतु कुठलीच मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वालिया यांना जळजळ कमी करण्यासाठी दूध, आईस्क्रीम, दही, अन्य डेअरी उत्पादने उपलब्ध करविण्यात आली नाहीत. ती डिश सामान्य माणसाच्या खाण्यायोग्य नव्हती. रेस्टॉरंट ड्रॅगन बॉल्स सारख्या ऐपेटायजरमध्ये अत्यंत अधिक थाई मिरची घालत असल्याने त्याच्याशी निगडित धोक्यांविषयी आरोग्य अधिकारी किंवा आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांशी सल्लामसलत करत खबरदारी बाळगण्यास अपयशी ठरल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
रेस्टॉरंटने आरोप नाकारले
तर कूप डी थाई रेस्टॉरंटने कुठल्याही प्रकारचे नुकसान पोहोचल्याचा दावा नाकारला आहे. ही डिश कमी मसालेदार करता आली नाही, कारण मिरची मीटबॉलच्या आत होती आणि रेस्टॉरंटच्या या डिशमुळे आजवर कुणालाही वैद्यकीय मदत घ्यावी लागली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.