कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हवामानात स्थायी बदल घातक

06:22 AM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक स्तरावर हरित धोरणे अवलंबिण्याची गरज

Advertisement

वर्तमान जागतिक हवामान धोरणांमध्ये लवकर सुधारणा न करण्यात आल्यास पृथ्वीवर अनेक क्लायमेट टिपिंग पॉइंट्स सक्रीय होऊ शकतात. वर्तमान धोरणांमुळे पृथ्वीच्या हवामान व्यवस्थेत गंभीर आणि स्थायी परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या घटना होण्याची शक्यता 62 टक्के आहे. हा इशारा युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर आणि हॅम्बर्ग युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या एका अध्ययनात देण्यात आला आहे. याचे निष्कर्ष प्रतिष्ठित नियतकालिक अर्थ सिस्टीम डायनॅमिक्समध्ये प्रकाशित झाले आहेत.

Advertisement

वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या 16 प्रमुख प्रणालींचे सखोल विश्लेषण केले, ज्यात अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमधील हिमावरण वितळण्यापासून अमेझॉन वर्षावनांमध्ये दुष्का आणि उष्णकटिबंधीय प्रवाळ भित्ती नष्ट होण्यासारख्या घटना सामील आहेत. अध्ययन 5 प्रमुख संयुक्त सामाजिक-आर्थिक दृष्टीकोनांवर आधारित असून ते भविष्यात सामाजिक संरचना, लोकसंख्या आणि आर्थिक बदलांसह ग्रीनहाउस वायूंच्या उत्सर्जनावर कोणता प्रभाव पडणार हे दर्शवितात. जागतिक स्तरावर हरित धोरणे अवलंबिण्यात आल्यास आणि ग्रीनहाउस गॅस उत्सर्जत ठोस घट झाल्यास या धोकादायक बदलांची शक्यता बऱ्याचअंशी कमी केली जाऊ शकते असे अध्ययनात म्हटले गेले आहे. टिपिंग पॉइंट्स सक्रीय होण्यापासून वाचणे अद्याप शक्य आहे, केवळ त्वरित आणि निर्णायक पावले उचलावी लागतील असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

हवामानात अपरिवर्तनीय बदल

टिपिंग पॉइंट असा बिंदू आहे, जेथे हवामान प्रणालीत छोटे बदल हळूहळू अपरिवर्तनीय आणि स्थायी होत राहतात. उदाहरणार्थ आर्क्टिक सागरी बर्फाचे वितळणे. तापमान वाढल्याने बर्फ वितळतो, ज्यामुळे आणखी अधिक उष्णता अवशोषित हेते अणि हे चक्र तीव्र होते. ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाच्या हिमावरणाचे निरंतर वितळणे याच्या स्थायी नुकसानीचे कारण ठरू शकते. अशाचप्रकारे अटलांटिक मेरिडियनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन कमकुवत पडल्याने युरोप समवेत अनेक क्षेत्रांचे हवामान गंभीर स्वरुपात प्रभावित होऊ शकते.

हे संकेत धोकादायक

ग्लोबल सिस्टीस्म इन्स्टीट्यूट, एक्सेटर विद्यापीठाचे प्राध्यापक टिम लेंटन यांच्यानुसार हवामान टिपिंग पॉइंट्स सक्रीय झाल्यास मानवतेवर याचे विध्वंसक प्रभाव पडू शकतात. आतापर्यंतचे संकेत स्पष्ट स्वरुपात आम्ही एका धोकादायक दिशेने पुढे सरकत आहोत असे सांगत आहेत असे लेंटन यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article