विविध मागण्यांसाठी दिव्यांगांची मनपाकडे धडक
11:34 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शासकीय मदत अन् योजना तातडीने द्या
Advertisement
► प्रतिनिधी / बेळगाव
दिव्यांगासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राखीव निधी दिला जातो. या राखीव निधीतून दिव्यांगाना विविध योजना लागू केल्या जातात. मात्र अर्ज करूनही त्याकडे दुल करण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने आम्हाला त्या योजना लागू कराव्यात, अशी मागणी दिव्यांग महिलांनी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंट्टी व उपायुक्त उदयकुमार तलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Advertisement
दिव्यांगासाठी विशेष राखीवनिधी ठेवला जातो. त्यामधूनच या दिव्यांग व्यक्तींना मोपेड, तीन चाकी सायकल, व्यवसाय करण्यासाठी कर्ज, लघुउद्योगासाठी कर्ज दिले जाते. मात्र अर्ज करूनही त्याकडे दुल होत आहे. त्यामुळे आम्हाला योजनेचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने त्या योजनांमधून अनुदान मंजूर करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
Advertisement