महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ई-खाता क्रमांकासाठी जनतेला करावी लागणार धावपळ

10:32 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आता विविध कामासाठी जाचक निर्बंध, जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : महानगर पालिकेमध्ये आता सर्वांनाच मालमत्तेचा ई खाता क्रमांक करून घ्यावे  लागणार आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांना धावपळ करावी लागत आहे. काही महिन्यापूर्वी सरकारने हा आदेश दिला होता. त्यानंतर या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र काही अटींमुळे शहरातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाला ई खाता क्रमांक घेतल्याशिवाय पर्याय नाही. घरपट्टी असो किंवा खरेदी-विक्री असो, याचबरोबर घरावर कर्ज काढायचे असेल तर त्यालाही ई खाता क्रमांक असणे आवश्यक आहे.

Advertisement

शहरातील बुडाकडून मिळालेली फ्लॉट असो किंवा इतर कोणतीही मालमत्ता असो त्यांना ई क्रमांक घ्यावाच लागणार आहे. सध्या या प्रक्रियेमुळे सरकारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ई अस्ती मोहिम राबविली जात आहे. मात्र जनतेकडून म्हणावा तसा सध्या तरी प्रतिसाद दिसून येत नाही. ई खाता क्रमांकसाठी उद्योजकांनाही नोंद करावी लागणार आहे. घराचे छायाचित्र, घराचा पूर्वीचा उतारा, कर भरलेली पावती, आधार कार्ड, दोन फोटो तसेच घराची लांबी-रूंदी द्यावी लागणार आहे. त्यामुळे जनतेला पुन्हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकूणच ई-क्रमांकासाठी साऱ्यांनाच त्रास सहन करावा लागणार हे निश्चित आहे. सध्या या प्रक्रियेमुळे सरकारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article