जिवंत मगर शिजवून खाणारे लोक
काही रुपयांमध्ये मिळते मगरीचे रक्त
मगरीला सर्वात मोठ्या शिकारींपैकी एक मानले जाते. याची शिकार वाचणे अत्यंत अवघड असते. परंतु एका देशात मगरीलाच शिकार केले जाते. थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर मगरींची पैदास केली जाते. तेथे लोक मगरीला अत्यंत आवडीने खात असतात. तेथे जवळपास 1000 हून अधिक फर्म्स असून तेथे जवळपास 12 लाख मगरींना ठेवण्यात आले आहे.
येथे मगरीला जिवंत कापले जाते, जेणेकरून त्याची कातडी, मांस आणि रक्त सहजपणे मिळविता येईल. ही फर्म कायदेशीर स्वरुपात नोंदणीकृत असून त्यांना मगरींना कापण्याची अनुमतीही मिळाली आहे.
थायलंडमध्ये मगरीचे मांस 570 रुपये किलो, रक्त 1 हजार रुपये प्रति लिटर या दराने विकले जाते. हे सर्व लोक अत्यंत आवडीने खात असतात. येथे मगरीच्या त्वचेपासून निर्मित बॅग्स दीड लाख रुपयांपर्यंत विकल्या जातात. तर लेदर सूट्सची किंमत सुमारे 4 लाख रुपये असते. मगरीच्या रक्ताचा वापर विविध औषधांमध्ये केला जातो. तसेच थायलंडमध्ये मगीरंच्या फर्म्सची सैर करण्यासाठी मोठ्या संख्येत पर्यटक येत असतात. तेथे मागील 35 वर्षांपासून मगरींची पैदास केली जात आहे.