महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलीच्या ‘चेहऱ्या’वर लोक झाले फिदा

06:31 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिने केलेला मेकअप ठरला लक्षवेधी

Advertisement

मुली स्वत:ला अधिक सुंदर दाखविण्यासाठी विविध प्रकारच्या उत्पादनांचा वापर करत असतात. जुन्या काळापासूनच अशा उत्पादनांचा वापर करून मुली स्वत:च्या सौंदर्यात भर घालत आल्या आहेत. अशीच एक कृष्णवर्णीय मुलगी स्वत:च्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.  सोशल मडियावर तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात महिला मेकअप कसा करावा हे शिकत असतात.

असाच एक व्हिडिओ 2023 मध्ये सर्वाधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओत दिसून आलेल्या मुलीने स्वत:च्या सौंदर्यामुळे लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टिकटॉकवर चालू वर्षात या मुलीचा व्हिडिओ सर्वाधिक वेळा पाहिला गेला आहे. या मुलगी मॉडेल असून तिचे नाव न्याडोली डेंग आहे. तिने मार्च महिन्यात स्वत:चा एक मेकअप ट्यूटोरियल पोस्ट केला होता, याला आतापर्यंत 504 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. हा टिकटॉक व्हिडिओ सध्या यादीत टॉपवर आहे. न्याडोली एक कृष्णवर्णीय मुलगी असून व्हिडिओत ती मेकअप कसा करावा हे शिकवत आहे.
Advertisement

स्वत:च्या चेहऱ्यावर विविध कंपन्यांच्या उत्पादनांचा वापर करत असल्याचे तिने सांगितले आहे. लोकांना तिची मेकअप करण्याची पद्धत अत्यंत पसंत पडली आहे. लोकांनी तिच्या सौंदर्यासोबत रंगाचेही कौतुक केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#akaluj #tarunbharatnews
Next Article