मृत ‘स्वकीयां’ची भेट घेतात लोक
पैसे खर्च करून करत आहेत संभाषण
एखादा मृत व्यक्ती जिवंत होऊ शकतो का? जर हे शक्य असते तर बहुधा कुणाच्या मृत्यूचे दु:ख कुठल्याच परिवारामध्ये दिसून आले नसते. परंतु चीनमध्ये सध्या लोक पैसे देऊन स्वत:च्या मृत स्वकीयांना ‘पुनरुज्जीवित’ करत आहेत. हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर ‘तंत्रज्ञान’ आहे.
चीनमध्ये सध्या एक वेगळाच प्रकार सुरु असून यात लोक पैसे देऊन स्वत:च्या मृत स्वकीयांचे एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अवतार तयार करवून घेत आहेत. मृतांना ‘पुनरुज्जीवित’ करण्यासाठी एआय सेवा उपयुक्त ठरत आहे, लोक अशा सेवांकरता 5 हजार तसे 10 हजार युआन इतका ठखर्च करत आहेत.
घोस्ट बॉट
या अवतारांना ‘घोस्ट बॉट’ म्हणूनही ओळखले जाते. एआय फर्म सुपर ब्रेनचे संस्थापक झांग जेवेई यांन तंत्रज्ञान मूलभूत अवतार निर्माण करण्यास सक्षम असून तो मृताची विचारसरणी आणि बोलण्याच्या पॅटर्नची नक्कल करत असल्याचे सांगितले आहे. मे 2023 मध्ये पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांतात कंपनी स्थापन केल्यावर त्यांच्या टीमने 30 सेकंदांच्या ऑडिओ व्हिज्युअल कंटेंटद्वारे हजारो कुटुंबांसाठी त्यांच्या मृत स्वकीयांना डिजिटल स्वरुपात पुनरुज्जीवित करण्यास मदत केली आहे. त्यांचे निम्म्याहून अधिक ग्राहक वृद्ध आईवडिल असून त्यांनी स्वत:च्या मुलांना गमाविले आहे.
एआय हीलिंग
चीनमध्ये अनेक लोकांना भावनात्मक गरजा आहेत. प्रत्येक ग्राहकाच्या वेगवेगळ्या गरजा असतात, आम्ही कस्टमाइज्ड कौन्सिलिंग सेवा देतो. एआय हीलिंग एक चॅटबॉक्स निर्माण करण्यासाठी आवाजांची नक्कल करतो आणि डिजिटल पोर्टेट एक बुद्धिमान बोलणाऱ्यासोबत एक 3डी डिजिटल मानव मॉडेलला सपोर्ट करण्यासाठी प्रोफाइल इमेज दिली असल्याचे झांग यांनी सांगितले. झांग यांच्या टीमने 600 हून अधिक परिवारांसाठी एआय हीलिंग सेवा यशस्वीपणे प्रदान केली आहे. त्यांचे शुल्क 60 हजार रुपयांपासून 1.16 लाख रुपयांपर्यंत आहे. ग्राहकांनी मृतांची छायाचित्रे, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सादर करणे आवश्यक असते असे त्यांनी म्हटले आहे.