महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एकमेकांवर आगीचे गोळे फेकतात लोक

06:41 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

येथे साजरा केला जातो धोकादायक महोत्सव

Advertisement

जगात अनेक देशांच्या परंपरा आणि रीति-रीवाज लोकांना  अजब वाटू शकतात, परंतु तेथील लोकांसाठी त्या अत्यंत खास असतात. असाच एक अनोखा महोत्सव असून तो मध्य अमेरिकेतील छोटासा देश एल साल्वाडोरच्या नजापा शहरात आयोजित होतो. दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी तेथे फायरबॉल फेस्टिव्हल आयोजित होत असतो. यात दोन टीम्स परस्परांवर आगीचे गोळे फेकत असतात.

Advertisement

सोशल मीडियावर या महोत्सवाची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या पेटते गोळे आकाशात भिरकटविले जात असल्याचे दिसून येते. चेहऱ्यावर मास्क असलेले लोक या धोकादायक खेळात सहभागी होतात. पेट्रोलमध्ये बुडवून आणलेले कपड्याचे गोळे पेटवून फेकले जातात. या खेळादरम्यान रस्त्यांच्या कडेला उभे असलेले हजारो प्रेक्षक ओरडत त्याचा आनंद घेत असतात.

का साजरा केला जातो?

हा महोत्सव 1658 मध्ये झालेल्या भीषण ज्वालामुखीच्या विस्फोटच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो. या ज्वालामुखी विस्फोटामुळे नजापाच्या लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले होते. हा महोत्सव म्हणजे 100 वर्षांपेक्षा जुनी परंपरा असून यात अनेक युवा दोन समुहांमध्ये विभागून परस्परांना पेटते गोळे फेकत असतात.

आगीचा रोमांच, वारशाचा जल्लोष

नजापाचा फायरबॉल फेस्टिव्हल हा जगातील सर्वात धोकादायक आणि अजब महोत्सवांमध्ये सामील आहे. येथील रस्त्यांवर जमा गर्दी या खेळाला युद्ध आणि आतिषबाजीच्या मिलापासारखे मानते. हा केवळ रोमांचाने भरलेला खेळ नसून येथील लोकांसाठी स्वत:चा वारसा आणि संस्कृतीला साजरी करण्याची पद्धत देखली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article