राष्ट्रपतींना पाहण्यासाठी शहरातील रस्त्यावर लोकांची गर्दी
कोल्हापूर प्रतिनिधी
देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या वारणा विद्यापीठ आणि वारणा महिला सहकारी उद्योग सुमहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळयाच्या निमित्याने सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यानिमत्याने विमानतळ ते श्री अंबाबाई मंदिर, श्री अंबाबाई मंदिर ते ताराबाई पार्कमधील सर्किट हाऊस, सर्किट हाऊस ते तावडे हॉटेल, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल पासून, ते वाठार, वाठर ते वारणानगर या मार्गावर वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्यासह सुमारे दोन हजार पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाहण्यासाठी त्यांच्या दौऱ्याच्या नियोजित मार्गावरील चौका-चौकात आणि रस्त्यालगतच्या इमारतीमध्ये नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन तऊण-तऊणीचा समावेश होता. त्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी होवू नये. याकरीता जिल्हा पोलीस दलाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या मार्गावऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी अंबाबाई मंदिरात आल्या होत्या. त्या मार्गावरील सर्व वाहतुक शहरातील अन्य पर्यायी मार्गावऊन वळविण्यात आली होती. त्यामुळे त्या मार्गावर वाहनाची मोठी गर्दी झाल्याने, वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तसेच या मार्गावरील वाहतुक संथगतीने सुऊ होती. दुपारी तीन नंतर शहरातील सर्व वाहतुक सुरळीत सुऊ झाली.
राष्ट्रपतीचा दौरा आणि खासगी ऊग्णालयाचे बेड राखीव
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यानिमित्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील दोन, पुणे-बेंगलोर महामार्गावरील दोन आणि वारणानगर परिसरातील एक अशा पाच खासगी मोठ्या ऊग्णालयांना काही बेड राखीव ठेवून, ऊग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहण्याबाबतचा आदेश दिला होता. त्याचबरोबर या पाच खासगी ऊग्णालयात आणि त्याच्या परिसरात ही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.