For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिचोलीत पाण्याविना लोकांची गैरसोय

01:06 PM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
डिचोलीत पाण्याविना लोकांची गैरसोय
Advertisement

तीन दिवस लोकांचे हाल, दुरूस्त केलेली जलवाहिनी दोन वेळा फुटली, आमदार शेट्योंकडून पाहणी

Advertisement

डिचोली : नाईकनगर बोर्डे डिचोली येथे मोठी जलवाहिनी दुसऱ्या जागी हलविण्याचे काम चालू असून काम पूर्ण केल्यानंतर तीनवेळा दुऊस्त केलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे डिचोली शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये गेले तीन दिवस पाणीपुरवठा ठप्पच आहे. त्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. तरीही पाणीपुरवठा विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने किही प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान जलवाहिनी दुरूस्तीकाम सुरू असलेल्या ठिकाणी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी भेट देऊन पाहणी करून काम लवकर संपविण्याची सूचना केली.

डिचोलीत पाणी नसल्याने अनेक इमारतींमधील लोकांचे हाल झाले आहेत. चार पाच माजले असलेल्या या इमारतींमध्ये पाणी उपलब्ध करण्यात लोकांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची पाळी आली. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुऊस्त करण्यात येणार असल्याने दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही, अशी नोटीस जारी केली होती. मात्र दोन दिवस उलटूनही तिसरा दिवस संपत आला तरी पाणी न मिळाल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.

Advertisement

खबरदारी न घेतल्याने गौरसोय

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनीही लोकांना झालेल्या त्रासाबद्दल  खेद व्यक्त केला व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन जलवाहिनी फुटणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र योग्य खबरदारी घेतली नसल्याने लोकांची गौरसोय झाली. सामाजिक कार्यकर्ते अभिजीत नोडा तेली यांनी स्वखर्चाने भायली पेठेतील लोकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. तसेच इतर भागात पाणीपुरवठा विभागातर्फे तसेच काही स्थानिकांनी पुढाकार घेऊन लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना केलेली आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनीही विविध भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा केला. नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर हे सलग दोन तीन दिवस दुऊस्ती कामाच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. रविवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले.

दुरुस्ती कामाच्या दिरंगाईबद्दल नागरिकांत नाराजी

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी पाणीपुरवठा विभागाला त्वरित जलवाहिनी दुऊस्ती करण्याचे आदेश दिले होते. रविवारी सकाळी त्यांनी काम चालू असलेल्या परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी काही नागरिकांनी ही घटनास्थळी जाऊन एकूण कामाच्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.