टीव्ही चालू ठेवून झोपतात लोक
कधीच बंद करत नाहीत लाइट
जगात अनेक देश असून त्यांची स्वत:ची अशी एक संस्कृती आहे. अनेक ठिकाणी आकर्षक वन्यसृष्टी आहे, तर कुठे शांतता. परंतु काही ठिकाणी लोकांचे जीवन सामान्य लोकांच्या तुलनेत काहीसे वेगळे असते. एका बेटावर लोक शांततेत कधीच झोपत नाहीत. त्यांच्या घरात लाइट्स आणि टीव्ही नेहमी सुरू असतो. मध्यरात्रीही टीव्ही तेथे सुरूच ठेवले जातात.
तुम्हाला झोपतेवेळी नरीव शांतता आणि मंद प्रकाश हवा असेल, परंतु जगात एका ठिकाणी लोक टीव्ही सुरू ठेवल्याशिवाय झोपूच शकत नाहीत. हे ठिकाण देखील आशियातच आहे, परंतु तुम्हाला याविषयी फारशी माहिती नसावी. या ठिकाणाचे नाव येऑन्गपेयॉन्ग असून ते छोटेसे बेट आहे.
दक्षिण कोरियातील छोटे बेट असलेल्या येऑन्गपेयॉन्गच्या लोकांच्या जीवनात अजिबात सुख-शांतता नाही. त्यांना सदैव सतर्क रहावे लागते. हे बेट दक्षिण कोरियाचा शत्रू देश उत्तर कोरियापासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे. जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाकडून येथे गोळीबार करण्यात आला होता, अशा स्थितीत लोक सदैव दक्ष असतात. त्यांनी आर्टिलरी अटॅकपासून वाचण्यासाठी बॉम्ब शेल्टर्समध्ये आश्रय घेतला होता. टीव्ही आणि लाइट चालू ठेवल्याशिवाय आम्ही झोपत नाही. येथे कधीही काहीही घडू शकते असे एका महिलेने सांगितले.
पूर्ण बेटावर बंकर
2010 मध्ये हल्ल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. अशा स्थितीत येथे अनेक बॉम्बशेल्टर्स निर्माण करण्यात आले आहेत. येथे निर्मित बंकर्समध्ये आठवडाभर पुरेल इतकी खाद्यसामग्री आणि वैद्यकीय सामग्री, गॅस मास्कसोबत बेडिंग शॉवर्स आणि मोठमोठे स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. उत्तर कोरियाच्या हल्ल्यात हे बेट उद्ध्वस्त होईल अशी भीती येथील लोकांना सतावत असते.