महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जनतेने ‘इंडिया’ आघाडीबरोबर राहावे

12:31 PM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आवाहन : गोव्यातील लोकसभा जागांबाबत चर्चा चालू

Advertisement

मडगाव : काँग्रेससह अन्य पक्षांचा समावेश असलेल्या ‘इंडिया’ आघाडीत आम आदमी पक्षाचा सहभाग असून आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार ठरविताना गोव्यातील लोकसभा जागांबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या मागे राहावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. बाणावलीत शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान, बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस, वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दिल्लीतील जनतेने तीन वेळा भरघोस मताधिक्य देऊन तसेच मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आणून आम आदमी पक्षावर विश्वास दाखविला आहे. कारण ‘आप’ने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असे यावेळी केजरीवाल यांनी नजरेस आणून दिले.

Advertisement

गोव्यात 2027 साली बहुमत द्या

दिल्लीत ऊग्णांच्या तपासणीसाठी सुमारे 550 मोफत मोहल्ला क्लिनिक उभारण्यात आली आहेत, तर पंजाबमध्ये दोन वर्षांतच 800 मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात आलेली आहेत. दोन्ही ठिकाणी मोफत वीज आणि पाणीपुरवठा देण्यात येत आहे. गोव्यातही यासहित कित्येक उपक्रम राबविता येतील. त्यासाठी 2027 साली गोव्यात ‘आप’ला बहुमत मिळवून द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

बाणावलीत मोहल्ला क्लिनिकबद्दल कौतुक

बाणावलीत आमदार व्हिएगस यांनी तीन ठिकाणी मोहल्ला क्लिनिक उपलब्ध करून दिलेली असल्याने आपण चकीत झालो झालो आहे. कारण आमचे सरकार येथे नाही. मात्र खासगी इस्पितळांतील डॉक्टर्स तसेच औषधालयांकडून मिळालेली देणगी स्वऊपातील मोफत औषधे घेऊन ही क्लिनिक सुरू आहेत. सत्तेत असलेल्या 33 आमदारांना हे जमलेले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

कल्याणकारी योजना राबविणे शक्य

अन्य पक्षांची सरकारे पंजाब व दिल्लीत होती तेव्हा मोफत वीज व पाणीपुरवठा देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत होते. कारण ते सरकारी तिजोरी लुटत होते. ते आमचे सरकार आल्यानंतर बंद झाले व लोकांना कल्याणकारी योजनांचा लाभ देणे शक्य झाले, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

‘आप’कडून मोफत सुविधांचे राजकारण : मान

अन्य पक्ष जाती, धर्मांचे राजकारण करत असून आम्ही आरोग्य आणि मूलभूत सुविधा मोफत देण्याचे राजकारण करत आहोत. हाच ‘आप’ आणि अन्य पक्षांतील फरक आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी 2027 मध्ये ‘आप’चे सरकार येथे प्रस्थापित करावे, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी यावेळी आवाहन केले. दिल्लीत आमचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राबविलेले विविध उपक्रम आम्ही सहजपणे पंजाबमध्ये राबवू शकलो. 664 मोफत तपासण्या व औषधे पुरविणारी अनेक मोहल्ला क्लिनिक मागील दोन वर्षांत सुरू केली. 26 जानेवारीपर्यंत ही संख्या 800 वर जाईल, असे त्यांनी सांगितले.

गोव्यातही ‘आप’ला संधी द्यावी

तसेच पंजाबमध्ये मोफत वीज आणि पाणीपुरवठा होतो. दिल्ली ही पंजाबपासून अडीचशे किलोमीटरांच्या अंतरावर असल्याने पंजाबातील जनतेला दिल्लीतील सरकारचे प्रशासन पाहून सारे काही कळून चुकले. गोव्याने याकडे गांभीर्याने पाहून येथे ‘आप’ला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गोवा जसा पर्यटनासाठी लोकप्रिय आहे तसाच पंजाबही आहे. पंजाबमधील एक पर्यटनस्थळ ‘मिनी गोवा’ म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे गोवा तसा आमच्यासाठी जवळचा आहे, असे मुख्यमंत्री मान म्हणाले.

राष्ट्रीय पक्षाची मान्यता

गोव्यातून दोन आमदार निवडून दिल्यानंतर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. त्याबद्दल आम्ही गोमंतकीयांचे ऋणी आहोत. ‘आप’ हा जलदगतीने वाढणारा पक्ष आहे, असे मान यांनी नजरेस आणून दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article