For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेला त्रास होता कामा नये : रोहन खंवटे

11:16 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनतेला त्रास होता कामा नये   रोहन खंवटे
Advertisement

पर्वरीतील वाहतूक वळविण्यासंबंधीच्या आढावा बैठकीत सूचना

Advertisement

पणजी : पर्वरी येथील प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामामुळे वाहतूक वळविण्यात येणार असून, या वाहतूक वळविण्यासंबंधीच्या योजनांसंबंधी पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामामुळे जनतेला त्रास होता कामा नये, त्या अनुषंगाने कामे व्हावीत, तसेच उपाययोजना काढाव्यात अशी सूचना केली. पर्वरी येथील सचिवालयात एलिव्हेटेड कॉरिडॉर कामाच्या आराखड्याबाबत काल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री खंवटे यांनी सांगितले की, वाहतूक वळविण्याच्या कामाच्यादृष्टीने वाहतूक वळवण्याच्या आराखड्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून होणार आहे. त्याअनुषंगाने बैठकीत आढावा घेण्यात आला.

दोन वर्षांत उड्डाणपूल पूर्ण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक वळविण्यासंबंधीच्या आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन कंत्राटदार करतात की नाही, याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. कंपनीने सादर केलेल्या सुरुवातीच्या योजनेनुसार फक्त एक किंवा दोन संरचना प्रभावित होतील, असेही मंत्री खंवटे म्हणाले. पणजी - पर्वरी - म्हापसा हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जनतेला या ठिकाणाहून ये-जा करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठीही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पर्वरी उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांत होणार असल्याने यामध्ये सामान्य नागरिकांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी ही आढावा बैठक घेऊन वाहतूक वळविण्याबाबत आणि त्याची अंमलबजावणी काटेकोर होण्याबाबत सूचना केल्याचे मंत्री खंवटे म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.