वेटर होण्यासाठी लोक देतात पैसे
जपानमध्ये एक असे रेस्टॉरंट आहे, जेथे लोक पैसे देऊन काही वेळासाठी वेटर किंवा वेट्रेस होण्यासाठी येतात. वेटर होत तेथील स्टाफला सर्व्हिस देतात. लोकांचा हा अजब ट्रेंड सध्या चर्चेत आहे. कॉस्प्ले संस्कृतीने प्रेरित पॉप-अप आउटलेट या ग्राहकांकडून शुल्क आकारते, जे स्वत:च्या मर्जीने वेटर किंवा वेट्रेस होण्याचे नाटक करू इच्छितात. त्यांना वेटरचा पोशाख दिला जातो आणि ते तेथील स्टाफला खाद्यपदार्थ वाढविण्याच्या ‘फॅन्टसी’चा आनंद घेतात.
2000 रुपयांचे शुल्क
जपानमध्ये एक अनोखा पॅफे ग्राहकांकडून 4000 येनचे शुल्क आकारत आहे, जेणेकरून ते वेटर होत तेथील स्टाफ सदस्यांना ग्राहकाच्या स्वरुपात सेवा देऊ शकतील आणि एक वेटर किंवा वेट्रेससारखा अनुभव प्राप्त करू शकतील. जपानमध्ये वेटर किंवा मेड कॉस्प्ले संस्कृतीला समर्पित एक रचनात्मक टीमकडून सुरू करण्यात आलेल्या या विचित्र नव्या टेंडने ग्राहकांचे लक्ष या दिशेने मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. समुहाने एक पॉप-अप अवधारणा सादर केली असून याचे नाव ‘कॅफे जेथे तुम्ही वेटर होऊ शकता’ आहे.
90 मिनिटांपर्यंत करतात काम
4 हजार येनमध्ये ग्राहक 90 मिनिटांपर्यंत अशाप्रकारच्या अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. कॅफेत आल्यावर गेस्ट स्वत:च्या मर्जीने वेटर किंवा वेट्रेसचा पोशाख निवडून तो परिधान करतात. परिसरात चेंजिंग रुम नसल्याने लोक स्वत:च्या कपड्यांवरच वेटर किंवा वेट्रेसचा गणवेश घालतात. कपडे परिधान केल्यावर ते चहा किंवा केक सर्व्ह करण्यास सुरुवात करतात. ग्राहकांना अनेक प्रकारचे वेटर पोशाख बदलण्याची देखील अनुमती असते.
महिला स्टाफ होतात ग्राहक
कॅफेत आलेले गेस्ट वेटर होत ज्या स्टाफची सेवा करतात, त्यांना ओजो-सामा म्हटले जाते. हे एक महिलासदृश पात्र असते, जे सर्वसाधारणपणे एक श्रीमंत, उच्चवर्गीय परिवारातील असल्याचे नाटक करते. ते प्रत्यक्षात ग्राहक नसते. ही व्यवस्था लोकांना वास्तविक ग्राहकांना हाताळण्याच्या तणावाशिवाय वेटर होण्याच्या कल्पनेत बुडून जाण्याची अनुमती देते. पॅकेजमध्ये स्मृतीकरता छायाचित्रेही सामील आहेत.