मृतदेहांशी विवाह करतात लोक
अविवाहित पुरुषाच्या थडग्यात टाकतात महिलांची हाडं
प्रत्येक ठिकाणच्या प्रथा इतर ठिकाणांपेक्षा वेगळय़ा असतात. अशीच एक प्रथा चीनमध्ये प्रचलित असून त्याला भूत विवाह (घोस्ट वेडिंग) म्हटले जाते. सर्वप्रकारच्या विवाहांप्रमाणेच यात देखील एक अविवाहित पुरुष आणि महिलेचा विवाह होत असतो, परंतु हा विवाह दोघंच्या मृत्यूनंतर केला जात असतो.
चीनमध्ये घोस्ट वेडिंगचा इतिहास 3 हजार वर्षे जुना आहे. या विवाहाच्या ंतर्गत लोक दोन अविवाहित परंतु मृत लोकांचा विवाह लावून देत असतात. विवाहाचे सुख जिवंतपणी मिळाले नसल्याने मृत्यूनंतर मिळावे, जेणेकरून पुढील जीवन किंवा मृत्यूनंतरचे आयुष्य आनंदात जावे, अशी यामागे लोकांची इच्छा असते. विवाहात पुरुषाच्या थडग्यात महिलेच्या हाडांना टाकले जाते.
हा विवाह देखील अन्य विवाहांप्रमाणे मोठय़ा उत्साहात आयोजित केला जातो. वधूचे कुटुंब वधूसाठी रकमेची मागणी करते. या रकमेच्या दाखल दागिने आणि घर देखील दिले जाते, परंतु हे केवळ कागदोपत्री असते, प्रत्यक्षात याचे पालन केले जात नाही. ही परंपरा दीर्घकाळापासून चीनच्या अनेक हिस्स्यांमध्ये पार पाडली जात आहे. मृत लोकांचाच हा अनोखा विवाह लावून दिला जातो, काही प्रकरणांमध्ये मृतदेह चोरण्यात आल्याचे किंवा जिवंत महिलांना ठार करण्यात आल्याचेही प्रकार घडले आहेत.
मृतदेहांची विक्री
चीनमध्ये दर 115.9 मुलांमागे केवळ 100 मुली आहेत. मुलांच्या हव्यासापोटी स्त्राrभ्रूणाची हत्या करण्याचे क्रूर प्रकार चीनमध्येही मोठय़ा प्रमाणावर घडत असतात. या कारणामुळे लोकांना आता घोस्ट मॅरेजसाठी अविवाहित महिला मिळत नसल्याचे चित्र आहे. याचमुळे युवतींचे मृतदेह दफनभूमीतून चोरण्याचे प्रकार चीनमध्ये वाढले आहेत.5 लाख रुपयांमध्ये युवतीचा मृतदेह किंवा मृतदेहाची हाडे लोकांना विकली जात आहेत. तर अधिक पैसे कमाविण्याच्या नादात युवतींची हत्याही केली जात आहे. ही प्रथा सर्वाधिक शैंगजी प्रांतात पाळली जाते, या प्रांतात कोळशाच्या खाणी असून अनेक अविवाहित युवक तेथे काम करतात. त्यांचा मृत्यू खाण दुर्घटनांमध्ये होत असतो. मृत्यूनंतर त्यांना आनंद देण्यासाठी त्यांचा विवाह मृतदेहांसोबत लावून देण्यात येत असतो.