महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सापांसोबत योग करतात लोक

06:42 AM Oct 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शरीरावर रेंगाळतात अजगर

Advertisement

मागील काही वर्षांपासून पूर्ण जगात योग अत्यंत चर्चेत राहिला आहे. परंतु योग काही नवी क्रिया नाही. हजारो वर्षांपासून भारतात योगसराव होत आहे. विदेशात अनेक योगगुरु तेथील लोकांना योगचे धडे देत आहेत. योगसरावराच्या पद्धती लोकांनी स्वत:च्या हिशेबानुसार बदलल्या आहेत. काही काळापूर्वी श्वानांसोबत योग करणे अत्यंत प्रचलित झाले होते. परंतु अमेरिकेत आता एका नव्या पद्धतीचा योगसराव चर्चेत आहे. तेथील लोक सापांसोबत योग करत आहेत. साप त्यांच्या शरीरावर रेंगाळत असतात.

Advertisement

कॅलिफोर्नियाच्या कोस्टा मीसामध्ये ‘लक्झरी योगा’ नावाचा एक स्टुडिओ आहे. हा योग स्टुडिओ एक नवा ट्रेंड सेट करण्याच्या प्रयत्नात आहे.  या स्टुडिओमध्ये लोकांना स्नेक योगा शिकविला जात आहे. ज्यात लोक सापांसोबत योग करतात. सापांची अत्यंत भीती वाटणारे लोकच हा योग प्रामुख्याने करत असतात.

45 मिनिटांचे एक सत्र

या योगसरावात शरीरावर अजगर फिरत असतो. यामुळे लोकांच्या मनातील सापांची भीती पळवून लावली जाते. योगसरावादरम्यान साप शरीरावर रेंगाळत असताना लोक स्वत:च्या श्वसनाला नियंत्रित करण्याचे कौशल्य शिकतात, यामुळे त्यांची भीती दूर होत असते. टेस काओ स्वत:चा पती हुए काओसोबत हा स्टुडिओ चालविते. या दोघांकडे अनेक अजगरं असून त्यांना ते पाळतात. या स्टुडिओत एक सेशन 45 मिनिटांचे असते, ज्याचे शुल्क 13,400 रुपये इतके आहे. आमचे साप अत्यंत साधे असून अत्यंत सहजपणे लोकांशी मैत्री करतात असे या दांपत्याचे सांगणे आहे.

4 वर्षांपर्यंतच्या वयाचे साप

लोक घाबरू नयेत म्हणून सत्रापूर्वी एक ओरिएंटेशन क्लास आयोजित केला जातो. ज्यात सापांना हाताळण्याच्या पद्धती सांगितल्या जातात. आजवर सापाने कुणालाही दंश केलेला नाही. आमच्याकडील साप 4 वर्षे वयापर्यंतचे आहेत. अनेक लोक केवळ हा अनुभव मिळविण्यासाठी क्लास घेतात. काही क्रियांमध्ये लोक जमिनीवर आडवे होतात आणि साप त्यांच्या शरीरावरून फिरत असतात. लोकांनी सापाची हालचाल चुकीची समजू नये म्हणून त्यांना पूर्वीच प्रशिक्षण दिले जाते असे काओ दांपत्याने सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article