For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारचा टायर अस्वच्छ असल्यास दंड

06:27 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारचा टायर अस्वच्छ असल्यास दंड
Advertisement

मिनेसोटामध्ये अजब कायदा

Advertisement

जगातील अनेक देशांमध्ये असे कायदे निर्माण करण्यात आले आहेत, जे अत्यंत विचित्र असतात. असाच एक अजब कायदा अमेरिकेच्या मिनेसोटा प्रांतात लागू करण्यात आला आहे. या प्रांतातील अनेक नियम-कायद्यांविषयी चर्चा होत अतसे. यातील काही अफवा देखील आहेत. तर काही केवळ थट्टेच्या स्वरुपात अफवेच्या स्वरुपात फैलावण्यात आल्या आहेत.

मिनेसोटामध्ये लोक डोक्यावर बदक ठेवून चालू शकत नाही असे बोलले जाते. किंवा रस्त्यावर हत्ती पार्क करणे तेथे अवैध आहे. परंतु तेथे काही कायदे लागू करण्यात आले असून ते अजब असले तरीही खरोखरच लागू आहेत.

Advertisement

मिनेसोटाच्या सर्वात अजब कायद्यांपैकी एक म्हणजे अस्वछ टायरसोबत तेथे गाडी चालविण्यास अनुमती दिली जात नाही. असे केल्यास तेथे मोठा दंड भरावा लागतो. मिनेसोटाच्या कायद्यानुसार अस्वच्छ टायरसोबत गाडी चालविणे अवैध आहे.

जर तुमच्या कारचे टायर अस्वच्छ असतील आणि यामुळे रस्ता अस्वच्छ होत असेल तर मिनेसोटाच्या रस्त्यांवर वाहन चालविण्यापूर्वी सावध व्हा. विशेष करून मिनेटोंकामध्ये अस्वच्छ टायरांसाब्sात वाहन चालविल्यास कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकते.

मिनेंटोकामध्ये मिनेसोटाच्या अध्यादेश संहितेच्या विविध कलमांच्या अंतर्गत शांतता, सुरक्षा आणि सामान्य कल्याणाला प्रभवित करणाऱ्या सार्वजनिक उपद्रवाच्या अंतर्गत चालकांना  रस्ता किंवा महामार्गवर चिखल, अस्वच्छता, चिकटणारा पदार्थ फैलावणारे टायर असणारे वाहन चालविण्याची अनुमती नाही. याचे उल्लंघन करण्यात आल्यास मोठा दंड आकारण्याची तरतूद कायद्यात आहे.

Advertisement
Tags :

.