भारतीय संघाला दंड
06:13 AM Dec 09, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / दुबई
Advertisement
नुकत्याच झालेल्या द. आफ्रिका विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने भारतीय क्रिकेट संघाला आयसीसीने दंड ठोठावला आहे.
Advertisement
भारतीय क्रिकेट संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रायपूरच्या दुसऱ्या सामन्यात षटकांची गती राखली नाही. त्यामुळे आयसीसीच्या इलाइट पंच पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी भारतीय संघाला 10 टक्के दंड ठोठावला आहे. आता या संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधनातील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. या दुसऱ्या सामन्यात रॉड टकेर आणि रोहन पंडीत हे मैदानावरील पंच होते.
Advertisement
Next Article