For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा

10:03 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा
Advertisement

बेळगाव : वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. गुरुवारी दिवसभरात खासकरून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या सूचनेवरून वाहतूक उत्तर व दक्षिण विभाग पोलिसांनी सर्वत्र तपासणी वाढवली आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याबरोबरच सदोष नंबरप्लेट व इतर वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. चालू महिन्याच्या 20 मार्चपर्यंत शहरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 3,891 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या काळात नशेत वाहने चालविलेल्या 55 जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असल्याचे पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले. अनेक अपघातात डोक्यावर हेल्मेट नसल्यामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. शरीरातील इतर कोणत्याही अवयवाला इजा पोहोचलेली नसते. केवळ डोक्याला जबर दुखापत होऊन दुचाकीस्वारांना प्राण गमवावा लागतो. हेल्मेटमुळे अपघातात जीव वाचू शकतो. त्यामुळेच विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई वाढवण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.