Miraj : मिरजमध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई; महापालिकेचा कठोर इशारा
स्वच्छ मिरज मोहिमेला वेग
मिरज : शहर स्वच्छतेसाठी आता महापालिकेने दंडात्मक कारवाईचे कठोर पाऊल उचलले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये किल्ला भाग परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांबर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जाग्यावरच पवती देऊन दड वसूल करण्यात आला. कचरा टाकण्यास प्रतिबंध असलेल्या ठिकाणांवर प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाईचे फलकही लावण्यात आले.
नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ओला आणि सुका कचरा विलगीकरण करुन केवळ घंटागाड्यांमध्येच कचरा टाकवा, असे आवाहन केले.शहरातील किल्ला भागात एका राष्ट्रीय बँकेच्या कंपाऊंड भिंतीला येथील नागरिकांनी कचरा कुंडी केले होते. ओला व सुका कचरा रस्त्यावरच टाकला जात होता. दिवसभर हा कचरा इतरत्र विस्कटला जात होता.
परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. या भागात महापालिकेची घंटागाडी नियमित कचरा संकलनासाठी येत असतानाही नागरिक आणि व्यवसायिकांकडून रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार घडत होते. या रस्त्यावरच बँका, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, बांधकाम विभाग आणि शाळाही असल्याने हा रस्ता कचरामुक्त करण्याची गरज होती.
तक्रारी प्राप्त होताच महापालिकेने याभागाची पाहणी केली. त्यानंतर तेथे कचरा टाकू नये, टाकल्यास दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा देणारा फलही लावला होता. तरीही काही नागरिक कचरा टाकताना दिसून आले. लागलीच महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधितांना पकडून दंडात्मक कारवाई केली. या कारवाई मोि हमे दरम्यान स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, स्वच्छता निरीक्षक सचिन बाघमोडे, महेश कांबळे, मनोज हरिजन, भाग मुकादम कोरके तसेच सय्यद उपस्थित होते.यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी दिला.