For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजू सॅमसनवर दंडात्मक कारवाई

06:32 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
संजू सॅमसनवर दंडात्मक कारवाई
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामना मानधनाच्या 30 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे. येथील अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान संघाला 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

दिल्ली संघानच्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सॅमसनने शानदार 86 धावांची जलद खेळी केली. पण त्याच्या संघाला अखेर पराभव स्वीकारावा लागला. सॅमसनकडून नेमका कोणता गुन्हा घडला ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र तो शाय होपकरवी सीमारेषेवर झेलबाद झाला, त्यावरून त्याने पंचांशी हुज्जत घातल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई झाली असण्याची शक्यता आहे. होपने सीमारेषेच्या अगदी काठावर त्याचा झेल टिपला होता, त्यावेळी त्याचा एक पाय सीमारेषेला स्पर्श केल्याचे वाटत होते. पण तिसऱ्या पंचांनी सॅमसन बाद असल्याचा निर्णय दिल्यावर त्याने नाराजी दर्शविली होती. बाद दिल्यानंतर तो प्रथम पॅव्हेलियनकडे परतत होता. पण लगेच तो परतला आणि मैदानी पंचांशी या निर्णयावरून हुज्जत घालू लागला होता.

Advertisement

‘आयपीएल आचारसंहितेच्या कलमानुसार सॅमसनकडून लेव्हल 1 चा अपराध घडला आहे आणि त्याने तो मान्यही केला असून सामनाधिकाऱ्यांचा दंडात्मक निर्णयही मान्य केला आहे. लेव्हल 1 अपराधासाठी सामनाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय अंतिम व बंधनकारक असतो,’ असे आयपीएलने निवेदनात म्हटले आहे. 10 एप्रिल रोजीही सॅमसनला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखल्याबद्दल 12 लाखाचा दंड करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.