For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेमा खांडू तिसऱ्यांदा अरुणाचलचे मुख्यमंत्री

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेमा खांडू तिसऱ्यांदा अरुणाचलचे मुख्यमंत्री
Advertisement

चोवना मेंन पुन्हा उपमुख्यमंत्री : 10 मंत्र्यांनीही घेतली शपथ

Advertisement

वृत्तसंस्था /इटानगर

पेमा खांडू यांनी गुरुवार, 13 जून रोजी सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यानंतर चोवना मेंन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा, किरेन रिजिजू आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय बिउराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. बुधवार, 12 जून रोजी इटानगर येथे झालेल्या बैठकीत खांडू यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तऊण चुग उपस्थित होते. यानंतर खांडू यांनी राज्यपाल के. टी. परनाईक यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

Advertisement

पेमा खांडू हे 2016 पासून अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत. नबाम तुकी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी प्रथमच पदभार स्वीकारला होता. खांडू पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते काँग्रेससोबत होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पेमा खांडू यांचे वडील दोरजी खांडू हेही अऊणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अऊणाचलमध्ये अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 60 पैकी 46 जागा जिंकल्या आहेत. पेमा खांडू यांच्यासह पक्षाचे 10 उमेदवार बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यामुळे केवळ 50 जागांवर निवडणूक झाली. राज्यात भाजपची नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सोबत युती आहे. एनपीपीला 5 जागा मिळाल्या. एकंदर अऊणाचलमध्ये एनडीएकडे 51 जागा आहेत. अऊणाचलमध्ये भाजप युतीने सर्व 60 जागा लढवल्या होत्या, तर काँग्रेसने केवळ 19 जागांवर उमेदवार उभे केले होते.

Advertisement
Tags :

.