महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पेडणे, बार्देशला महिनाभर पाणीटंचाई

12:10 PM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिराळी कालवा दुरुस्तीकामाचा परिणाम : पेडण्यातील बागायती सापडल्या संकटात

Advertisement

पणजी : तिळारी धरण व गोव्याकडे पाणीपुरवठा करणारे कालवे यांचे दुरूस्तीकाम सुरू झाल्यामुळे पेडणे आणि बार्देश या तालुक्याला तिळारीचे पाणी येणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम अस्नोडा व पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पांवर झाला असून तेथील पाणीपुरवठा पुर्ववत होईपर्यंत बार्देश तालुक्याला मर्यादित पाणी मिळणार आहे. काही भागांना एक दिवसाआड पाणी देण्यात येणार असून सुमारे महिनाभर तरी पाणीटंचाई सोसावी लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. पेडणे तालुक्यावरही तिळारीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

 महिनाभर चालणार पाणीटंचाई

गेल्या 13 नोव्हेंबरपासून तिळारी धरण व कालव्याची दुरूस्ती सुरू करण्यात आली असून ती सुमारे महिनाभर चालणार आहे. त्यामुळे तेथून गोव्याकडे येणारे पाणी बंद करण्यात आले असून अस्नोडा व पर्वरी प्रकल्पांना त्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. पर्वरीचा प्रकल्प हा तिळारीच्या पाण्यावर अवलंबून असून इतर कोणत्याही मार्गाने येथे पाणी नेणे शक्य नसल्याने तो प्रकल्प जवळजवळ बंद पडल्यास जमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमठाणेहून अस्नोड्यात पाणी

जलस्त्राsत खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आमठाणे धरणाचे पाणी अस्नोडा प्रकल्पाकडे वळवण्यात आले असून तो कार्यरत ठेवला आहे. परंतु पर्वरी प्रकल्प कार्यान्वित ठेवणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पर्वरी भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तिळारी धरणातून येणारे कच्चे पाणी बंद झाल्यामुळे बार्देश तालुक्यावर आता मर्यादित पाणीपुरवठा करण्याचे ठरवण्यात आले आहे. पाणी देण्याच्या वेळेतही बदल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पेडण्यातील बागायती संकटात

पेडणे तालुक्यातील अनेक गावातील बागायती तिळारीच्या पाण्यावर अवलंबून असून ते पाणी बंद झाल्यामुळे बागायती संकटात सापडल्या आहेत. गोव्याकडे पाणी घेवून येणारे कालवे पूर्णपणे सुकले असून त्यात पाण्याचा एक थेंबही दिसत नाही. पेडणे तालुक्यातील तिळारीच्या कालव्याची ही परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article